शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

ट्रान्सपोर्ट रायडर्सला मसिआ चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:06 IST

नेहमी खरेदी-विक्रीचे व्यस्त ठेवणारे व्यवहार, भावातील चढ-उताराने होणारी चिंता आणि करांच्या जाळ्यात अडकल्याने आकडेवारी आणि हिशेब ठेवता ठेवता त्रस्त झालेल्या व्यापारी वर्गाने मात्र रविवारी वेगळाच अनुभव घेतला.

नाशिक : नेहमी खरेदी-विक्रीचे व्यस्त ठेवणारे व्यवहार, भावातील चढ-उताराने होणारी चिंता आणि करांच्या जाळ्यात अडकल्याने आकडेवारी आणि हिशेब ठेवता ठेवता त्रस्त झालेल्या व्यापारी वर्गाने मात्र रविवारी वेगळाच अनुभव घेतला. बाजारभावापेक्षा महत्त्वाचे ठरले ते रनरेटचे चढ-उतार, मार्चएंडच्या उद्दिष्टापेक्षा महत्त्वाचे ठरले ते रन्सचे टार्गेट आणि कर भरण्याच्या डेडलाइनपेक्षा महत्त्वाची ठरली ती बॉँड्रीलाईन. ‘व्यवसायिक स्पर्धा’ बाजूला ठेवून क्रिकेटमध्ये ‘स्पर्धा’ करणाºया या १३ संघांनी मजा लुटली आणि अंतिम सामन्यात ट्रान्सपोर्ट रायडर्सने हॅम्पवा फालकन्सचा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले.  महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ँड अ‍ॅग्रीकल्चरच्या वतीने व्यापाºयांना दैनंदिन कामकाजातून विरुंगळा मिळावा यासाठी मसिआ व्यापारी करंडक २०१८ या क्रिकेट स्पर्धेचे महात्मानगर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी झालेल्या व्यापारी संघटनांनी संघांची नावेही अफलातून ठेवली होती. नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेने किराणा किंग्ज, नाशिक सराफ असोसिएशनने सराफ गोल्डन इलेव्हन, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने ट्रान्सपोर्ट रायडर्स, नाशिक मोटार मर्चंट्स असोसिएशनने मोटार मर्चंट्स सुपर स्ट्रायकर्स, नाशिक टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनने टॅक्स सॅव्हियर्स, नाशिक हॉडवेअर अ‍ँड पेंट मर्चंट असोसिएशनच्या वतीने हॅम्पवा फालकन्स, नाशिक कॉम्प्युटर्स असोसिएशनने कॅन चॅलेंजर्स, असोसिएशन आॅफ रियल इस्टेट कन्स-ल्टंट्सने एआरसी वॉरियर्स अशी नावे ठेवली होती.  प्रारंभी चेंबरचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू माधवराव आपटे यांच्या हस्ते स्पर्धेेचे उद्घाटन झाले. त्यांनीदेखील उपक्रमाचे कौतुक केले.  यावेळी व्यासपीठावर चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, माजी अध्यक्ष हेमंत राठी, खुशालभाई पोद्दार, सलीम बटाडा, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे, दिलीप साळवेकर, चंद्रकांत दीक्षित आदी उपस्थित होते.पुरस्कार प्रदानया स्पर्धेत १३ सामने झाले. या स्पर्धेत मॅन आॅफ द मॅच गोकुळ पाटील, रोहित चावला, रवि जोशी, मफद्दल मर्चंट, तेजपालसिंग, कणव गुप्ता, अमोल काळे, अनिल थेटे, सुमित पटवा, राजेंद्र पंजवाणी, कमलसिंग राठोड, सोहल खान यांना पुरस्कार देण्यात आला. तर कमलसिंग राठोड हे मॅन आॅफ द सिरीजचे मानकरी ठरले. उत्कृष्ट गोलंदाज जितेंद्र लाड, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कमलसिंग राठोड यांच्याबरोबरच सोहेल खान, सुबोध मगर यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  तब्बल तेरा सामन्यांनंतर झालेल्या अंतिम सामन्यात ट्रान्सपोर्ट रायडर्सने ७६ धावांचे उद्दिष्ट दिले असताना हॅम्पवा फालकन्स ६५ रन्सच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगला होता. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते विजेत्यांना तर चेंबरचे माजी अध्यक्ष विक्रम सारडा यांनी उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सीमा हिरे यांनी चेंबरच्या उपक्रमाचे कौतुक केले तर चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यापारी संघटनांचा मिळालेला प्रतिसाद बघता आता हा उपक्रम राज्यस्तरावर नेऊन व्यापारी महाकरंडक स्पर्धा भरविल्या जातील, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Sportsक्रीडाCricketक्रिकेट