शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील शहर बससेवेबाबत शिवसेना घेणार परिवहनमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:43 IST

शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते : बससेवा मनपाने ताब्यात घेण्यास विरोध

ठळक मुद्देमहापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घेऊ नये, या भूमिकेवर शिवसेना ठामविभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शहर बससेवेची सद्यस्थिती समजून घेतली जाणार

नाशिक - महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घेऊ नये, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक लवकरच राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेतील सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने शहर बससेवा ताब्यात घेण्याची मानसिकता तयार केली असून येत्या महासभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सर्वेक्षणासाठी क्रिसील या संस्थेची नियुक्ती केली होती. त्यानुसार, क्रिसीलने महापालिका आयुक्तांकडे आपला अहवाल सादर करत बससेवेबाबतचे पर्याय सुचविले आहेत. त्यात प्रामुख्याने, सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळाला दरमहा २ कोटी रुपये तोटा येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या सा-या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी शहर बससेवा ताब्यात घेण्यास सेनेचा पूर्णपणे विरोध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. बोरस्ते यांनी क्रिसीलच्याही अहवालाबाबत शंका उपस्थित करत वस्तुस्थिती निराळी असल्याचे सांगितले. शहर बससेवा चालविणे हे महापालिकेचे काम नसून एसटी महामंडळानेच उत्पन्नाचे स्त्रोत शोधून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी लवकरच विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शहर बससेवेची सद्यस्थिती समजून घेतली जाणार आहे. याशिवाय, राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांचीही भेट घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. यावेळी शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, संतोष गायकवाड उपस्थित होते.वाहतूक धोरणावर उद्या कार्यशाळाराज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने राज्य नागरी वाहतूक धोरण प्रस्तावित केले असून त्यात शहरातील सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. या धोरणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.२) सकाळी १०.३० वाजता मनपा आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे संचालन राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आयटीडीपी या संस्थेमार्फत केले जाणार आहे. दरम्यान, या कार्यशाळेत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका