शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

धुळवडमध्ये बिबट्यांचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 00:11 IST

सिन्नर: तालुक्यातील धुळवड येथील तरवडी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने या भागात लावलेल्या पिंजऱ्यात गेल्या आठवड्यात बिबट्या जेरबंद झाला असला, तरी या परिसरात आणखी तीन ते चार बिबटे असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे शेतकरी भयभीत: आणखी चार बिबटे असल्याचा संशय

वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आणखी दोन पिंजरे लावले आहेत. तालुक्यातील धुळवड व चापडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धुळवड-पिंपळे रस्त्यालगत वसंत शिवराम आव्हाड यांची शेतजमीन व वस्ती आहे, तसेच तरवडी शिवारात आणखी काही कुटुंब वस्ती करून राहत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील वसंत आव्हाड, भाऊसाहेब आव्हाड, बाजीराव आव्हाड, पंढरी आव्हाड आदींसह शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. रात्री-अपरात्री या भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. बिबट्याचा वावर वाढल्याने या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.बिबट्यांच्या डरकाळ्यांनी नागरिक भयभीतधुळवड परिसरात तीन ते चार बिबटे शेतकऱ्यांनी पाहिले होते. रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या डरकाळ्या ऐकायला येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, तालुक्याच्या नायगाव, म्हाळुंगी, भोजापूर खोऱ्यात बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. काही भागांत शिकारीच्या शोधात मध्यंतरी बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागरी वस्त्यांमध्ये बिबट्याचे हल्ले झाल्यानंतर वनविभागाकडून पिंजरे लावून त्यांना जेरबंद करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या