शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:36 IST

महापालिका : लोकसंख्येनुसार विभागनिहाय नियोजन

ठळक मुद्देसदर कर्मचा-यांच्या नेमणूका आता सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात करण्यात आल्या आहेतस्वच्छ सर्वेक्षणाच्या कालावधीत शहराच्या साफसफाईच्या कामाची घडी विस्कटू नये, याकरीता समानवाटपाला ब्रेक बसला होता

नाशिक - शहरातील सहाही विभागात सफाई कामगारांच्या संख्येबाबत असमतोल दूर करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नाशिक पूर्व, नाशिकरोड आणि नाशिक पश्चिम विभागातील ४७८ सफाई कर्मचा-यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. सदर कर्मचा-यांच्या नेमणूका आता सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात करण्यात आल्या आहेत.महापालिकेच्या आरोग्य विभागात १८६३ सफाई कामगार कार्यरत आहेत. मात्र, प्रत्यक्षात १४७४ कर्मचारीच साफसफाईची कामे करत होते तर उर्वरित ३८९ कर्मचारी हे कामाच्या सोईने तसेच राजकीय पुढा-यांच्या वरदहस्तामुळे वर्षानुवर्षापासून अन्य विभागात काम करत होते. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध विभागात काम करणा-या ३८९ कर्मचा-यांना दणका दिला आणि त्यांना मूळ सेवेत जाण्याचे आदेश काढले. दरम्यान, अभिषेक कृष्ण आयुक्त असताना विभागनिहाय सफाई कर्मचा-यांचे समसमान वाटप करावे, अशी मागणी सत्ताधा-यांसह विरोधकांकडून झालेली होती.त्यानुसार, आयुक्तांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांना त्यानुसार कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु, स्वच्छ सर्वेक्षणाच्या कालावधीत शहराच्या साफसफाईच्या कामाची घडी विस्कटू नये, याकरीता समानवाटपाला ब्रेक बसला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी त्याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर आरोग्याधिका-यांनी नाशिकरोड, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम याठिकाणी अतिरिक्त असलेल्या ४७८ सफाई कामगारांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. या सफाई कामगारांच्या नेमणूका संख्येने कमी कर्मचारी असलेल्या सिडको, सातपूर आणि पंचवटी विभागात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका