शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांकडून बदलीसाठी  हृदय शस्त्रक्रियेची खोटी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 01:18 IST

आॅनलाइन बदलीसाठी शिक्षकांनी कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाची व स्वत:च्या आजारपणाची कारणे दिली असून, यातील बहुतांश माहिती खोटी असल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. काही शिक्षकांनी हृदय शस्त्रक्रीय झालेली नसतानाही प्रमाणपत्र दाखल केल्याचे निर्देशनास आले.

नाशिक : आॅनलाइन बदलीसाठी शिक्षकांनी कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणाची व स्वत:च्या आजारपणाची कारणे दिली असून, यातील बहुतांश माहिती खोटी असल्याचा संशय जिल्हा परिषद प्रशासनाला आहे. काही शिक्षकांनी हृदय शस्त्रक्रीय झालेली नसतानाही प्रमाणपत्र दाखल केल्याचे निर्देशनास आले.  शिक्षकांनी दिलेले प्रमाणपत्र आणि आजाराबाबत सांगितलेल्या माहितीत शिक्षकांचा गोंधळ उडाला. त्यामुळे अशा गैरप्रकारांच्या तपासणीसाठी आजारपणाशी संबंधित कागदपत्रांची जिल्हा शल्यचिकित्सकां कडून पडताळणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.  आॅनलाइन बदलीप्रक्रियेत खोट्या माहितीच्या आधारे सोयीची बदली पदरात पाडून घेणाऱ्या १६६ शिक्षकांची सुनावणी प्रक्रिया सलग दुसºया दिवशीही पूर्ण होऊ शकली नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी एका मागून एक येणाºया शिक्षकांची कै फियत ऐकून घेण्यात आणि शिक्षकांनी आॅनलाइन माहिती भरण्यात केलेल्या चुका निदर्शनास आणून देण्यात अधिक वेळ गेल्याने शनिवारी सुनावणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. बागलाण, कळवण, चांदवड, नांदगाव, देवळा, मालेगाव आणि इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर तसेच गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या सहाय्याने तांत्रिक यंत्रणेच्या माध्यमातून सत्यतेची पडताळणी केली जात आहे. यात शिक्षकांशी प्रत्यक्ष बोलून त्यांच्या कागदपत्रांच्या सत्यतेविषयी, तसेच बदली अंतरातील तांत्रिक बाबी पडताळून पाहिल्या जात असून, याप्रक्रियेत अधिक वेळ जात असल्याने सुनावणीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उर्वरित शिक्षकांची शनिवारी (दि. २१) सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुनावणी घेण्यात आली. यात प्रामुख्याने पाच तालुक्यांमधील शिक्षकांच्या सुनावण्या झाल्या. परंतु शनिवारीही सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे उर्वरित शिक्षकांना रविवारी सकाळी १० वाजता बोलाविण्यात आले आहे. दरम्यान, बदलीसाठी दिलेले अंतर शिक्षकांनी चुकीचे दिल्याचे यावेळी दिसून आले, तर काही शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याची कबुलीही दिल्याची माहिती गिते यांनी दिली आहे.शिक्षकांचे पितळ सुनावणी प्रक्रियेतून उघडेबदलीतून सूट मिळविण्यासाठी आणि सोयीच्या बदलीसाठी अपंग प्रमाण पत्राप्रमाणेच आजारपणाची प्रमाणपत्रे आणि संलग्न कागदपत्रांची तपासणीही यावेळी करण्यात आली. त्यामुळे आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अनेक शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविल्याचे पडताळणीत समोर आले असून, चुकीची माहिती देणाºया शिक्षकांचे पितळ सुनावणी प्रक्रियेतून उघडे पडल्याने बोगस माहिती देणाºया शिक्षकांवर कारवाई होणे निश्चित झाले आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदTeacherशिक्षक