शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत भेटीपूर्वी पुतिन यांचे मोठे पाऊल; रशियाने भारतासोबत लष्करी कराराला दिली मान्यता
2
रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ९० च्या खाली, तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
3
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
4
किमान पेन्शन १००० रुपयांवरुन ७,५०० रुपये होणार का? सरकारने लोकसभेत दिलं उत्तर
5
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
6
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
7
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
8
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
9
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
10
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
11
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
12
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
13
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
14
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
15
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
16
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
17
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
18
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
19
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
20
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
Daily Top 2Weekly Top 5

तीन गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:40 IST

ग्रामविकास विभागाने राज्यातील दहा गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात मालेगावचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांची जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली, तर चांदवड व देवळा या दोन्ही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची अदलाबदल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखपदी पिंगळे

नाशिक : ग्रामविकास विभागाने राज्यातील दहा गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात मालेगावचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांची जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली, तर चांदवड व देवळा या दोन्ही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची अदलाबदल करण्यात आली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते. शासनाने आता या पदावर मालेगावचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांची नेमणूक केली आहे. पिंगळे यांनी यापूर्वीही जिल्ह्यात काम केलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागाची चांगली माहिती व प्रश्नांची जाण आहे. त्याचबरोबर विभागीय आयुक्त कार्यालयात सहायक आयुक्त असलेले आर. ए. देशमुख यांची देवळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून तर देवळ्याचे गटविकास अधिकारी एम. यू. पाटील यांची चांदवड पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी आनंद पिंगळे यांनी आपला पदभार स्वीकारला. तत्पूर्वी जिल्हा परिषदेतून नाशिक महापालिकेत बदली झालेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी प्रदीप चौधरी यांना जिल्हा परिषदेकडून निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद गेल्या महिन्यापासून रिक्त असून, सध्या या पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उज्ज्वला बावके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी या पदावर अधिकाºयांची नियुक्ती होण्याची अपेक्षा होती, परंतु त्याबाबतचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी