शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाभार्थ्यांना घरकुल योजनेत स्थलांतरीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 23:52 IST

मालेगाव : गेल्या महिन्यात नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १७८ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भुखंडांवरील, नागछाप झोपडपट्टीला जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांना व आगित दुर्घटनाग्रस्त झोपडपट्टीधारकांकडून कायदेशीररित्या कागदपत्रांची पूर्तता करुन त्यांचे म्हाळदे घरकुल योजनेत स्थलांतरीत करावे तसेच नागछाप झोपडपट्टीत लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारकांची एक वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, महापालिकेकडून आपदग्रस्तांना आर्थिक मदत करता येईल का? याबाबत शासनाकडून अभिप्राय व मत मागविण्याच्या सूचना महापौर रशीद शेख यांनी महासभेत प्रशासनाला केल्या आहेत.

ठळक मुद्देजवानांनी जीवाची परवा न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला

मालेगाव : गेल्या महिन्यात नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १७८ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भुखंडांवरील, नागछाप झोपडपट्टीला जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांना व आगित दुर्घटनाग्रस्त झोपडपट्टीधारकांकडून कायदेशीररित्या कागदपत्रांची पूर्तता करुन त्यांचे म्हाळदे घरकुल योजनेत स्थलांतरीत करावे तसेच नागछाप झोपडपट्टीत लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या झोपडपट्टीधारकांची एक वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी, महापालिकेकडून आपदग्रस्तांना आर्थिक मदत करता येईल का? याबाबत शासनाकडून अभिप्राय व मत मागविण्याच्या सूचना महापौर रशीद शेख यांनी महासभेत प्रशासनाला केल्या आहेत.नागछाप झोपडपट्टीला लागलेल्या आगीनंतर आपदग्रस्तांच्या मदतीबाबत विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थितीत विशेष महासभा बोलविण्यात आली होती. या महासभेत नागछाप झोपडपट्टी भागातील झोपडपट्टीधारकांना स्थलांतरीत करण्याविषयावर चर्चा करण्यात आली. खाजगी जागेवरील अतिक्रमणधारक वगळून महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवर, रस्त्यांवर अतिक्रमीत असलेल्या व म्हाळदे घरकुल योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची तातडीने स्थलांतरीत करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. तसेच आगबाधित १७८ झोपडपट्टीधारकांना एक वर्षाची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याच्या सूचना महापौरांनी केली. प्रशासनाला याबाबत अडचण असेल तर महापौरांनी स्वत: पाणीपट्टी व घरपट्टी पोटीचे पैसे भरण्याची घोषणा सभागृहात केली. आपदग्रस्तांना महापालिकेकडून आर्थिक मदत देता येईल का याबाबत शासनाकडून अभिप्राय व मत मागविण्याच्या सूचना नगरसेवकांनी केल्या. झोपडपट्टी भागात रूग्णवाहिका व अग्निशमन दलाची कशी जाईल अशी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सांगत महापौरांनी स्थलांतराच्या विषयावर कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण करू नये. नागरिक पैसे भरुन घरकुल योजनेत स्थलांतर करण्यास तयार आहेत. सर्व सोयीसुविधा युक्त इमारत आहे. झोपडपट्टीधारक स्थलांतरीत झाले तर जुन्या शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असे महापौरांनी सांगितले. दरम्यान, महागठबंधन आघाडीच्या नगरसेवकांनी मानधन व सदस्यांनी वैयक्तीक ८० हजार रूपयांची आर्थिक मदत नागछाप झोपडपट्टीतील आग बाधित रहिवाशांना देण्याचे आश्वासन सभागृहात दिले आहे.उपायुक्तांची असंवेदनशिलता सभागृहात उघडमनपाच्या विशेष महासभेस नागछाप झोपडपट्टीतील आग बाधितांना मदतीच्या गंभीर विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना उपायुक्त नितीन कापडणीस भ्रमणध्वनी चाळण्यात व्यस्त होते. त्यांना विषयाचे गांभीर्य नसल्याची बाब एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कापडणीस यांना चांगलेच धारेवर धरीत खडसावले. त्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीला हात लावला नसल्याचे सभागृहात दिसून आले.अग्निशमन अधिकारी, जवानांचा सत्कारनागछाप झोपडपट्टीला लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी जीवाची परवा न करता आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. महापौर रशीद शेख यांनी अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाºयांचे कौतुक केले. तसेच अग्निशमन दलाचे अधीक्षक संजय पवार व जवानांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.