शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एचएएलच्या ३९ स्थानिक कामगारांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 22:53 IST

ओझर : एचएएल प्रशासनाने नाशिक विभागाच्या ३९ कामगारांची बदली नव्याने स्थापन झालेल्या तुमकुर हेलिकॉप्टर विभाग व बंगळुरू या दोन ठिकाणी केल्याने नाशिक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देओझर : पहिली यादी प्रसिद्ध; संघटनेच्या आश्वासनाकडे लक्ष

ओझर : एचएएल प्रशासनाने नाशिक विभागाच्या ३९ कामगारांची बदली नव्याने स्थापन झालेल्या तुमकुर हेलिकॉप्टर विभाग व बंगळुरू या दोन ठिकाणी केल्याने नाशिक विभागात प्रचंड असंतोष पसरला आहे.त्या मुद्द्यावरून नुकतीच झालेली कामगार संघटनेची निवडणूक चोहीबाजूंनी गाजली होती. एचएएल नाशिक विभागात काही वर्षांपूर्वी ३३ कामगारांची अभिहस्तांकन तत्त्वावर तर २५ जणांची इतर विभागात कायम बदली झाली. ३३ पैकी १४ कामगार पुन्हा नाशिक विभागात सक्रिय झाले. आता स्थानिक कामगारांची बदली झाल्याने तिप्पट ताकद देण्याच्या हालचाली आणखीन मंद झाली असली तरी तूर्तास कामगार संघटनेची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.निवडणुकीत हाच मुद्दा ठरला कळीचासहा महिन्यांपूर्वी नाशिक विभाग कामगार संघटना निवडणूक संपन्न झाली. मागील वेळी सरचिटणीस असलेले सचिन ढोमसे यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा कामगारांच्या बदल्या झाल्या आणि ते सतत टीकेचे धनी होत राहिले. तोच मुद्दा पकडत निवडून आलेले सरचिटणीस संजय कुटे यांनी प्रचारादरम्यान एकही कामगारांची बदली होऊ देणार नाही याची छाती ठोक ग्वाही देत मागील वेळी बदली झालेले पंचवीस कामगार सहा महिन्यांच्या आत पुन्हा नाशिक विभागात रुजू केले जातील असा विश्वास दिला असताना कामगारांनी देखील त्यांना मताधिक्य देत सरचिटणीस केले, परंतु सद्य:स्थितीत त्यात आणखी ३९ स्थानिक कामगारांची बदली झाल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.तूमकुर विभागात बदली का?निर्मला सीतारामन यांनी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत तूमकुर येथे हेलिकॉप्टर बनवण्याचा नवीन विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करत सुरू केला, परंतु नाशिक विभागात सर्वच उपकरणे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा तयार असताना तेथे नवीन विभाग सुरू करत नेमके काय साध्य झाले, हा मुख्य सवाल आहे. खरे तर रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना बदली हा त्याला पर्याय नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. याउलट नाशिक विभागाचे एसीएमए विमान कोईम्बतूरला हलवण्याचा घाट घातला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.प्रसिद्धिपत्रक आणि संभ्रम?गोवा येथे बारा कामगारांची गरज असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध झाले असताना तेथूनच दोघांची बदली तुमकुर येथे झाल्याने बदली प्रक्रियेत संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र आहे.लोकमतने टाकला होता प्रकाशझोतनरेंद्र मोदींच्या आठ वर्षांपूर्तीच्या निमित्ताने त्यांनी नाशिकला दिलेल्या आश्वासनाचा ग्राउंड रिपोर्ट लोकमतने आठवड्यापूर्वी मांडला होता. त्याचा प्रत्यय सोमवारी (दि. ६) झालेल्या बदलीवरून आला. शिवाय नाशिक इतकी हजारो एकर जागा आणि सुविधा कुठेही नसताना याच विभागाला अपंगत्व येते की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :OzarओझरNashikनाशिक