शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील व्यवहार सुरळीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:46 IST

सटाणा : नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर सटाणा शहरातही प्रतिबंधित क्षेत्र केवळ बाधित रुग्णाच्या इमारत किंवा गल्लीपुरते ठेवावे. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी मिळावी या मागणीस मागणीस प्रशासकीय स्तरावरून हिरवा कंदील मिळाला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे निर्देश दिले असून, यामुळे सटाणावासीयांना दिलासा मिळणार आहे.

सटाणा : नाशिक महानगरपालिकेच्या धर्तीवर सटाणा शहरातही प्रतिबंधित क्षेत्र केवळ बाधित रुग्णाच्या इमारत किंवा गल्लीपुरते ठेवावे. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यास परवानगी मिळावी या मागणीस मागणीस प्रशासकीय स्तरावरून हिरवा कंदील मिळाला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे निर्देश दिले असून, यामुळे सटाणावासीयांना दिलासा मिळणार आहे.याबाबत शुक्रवारी (दि. २२) नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांची भेट घेतली. त्यांनी याबाबत तत्काळ पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असता मागणीस हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत मिळाले आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी तत्काळ बागलाणच्या प्रांताधिकाºयांना दूरध्वनीद्वारे उपरोक्त निर्देश दिल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. शहरात सद्यस्थितीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने गेल्या दोन महिन्यापासून ठप्प झालेले दैनंदिन व्यवहार सुरू करून व्यावसायिकांसह सर्वसामान्य शहरवासीयांना दिलासा द्यावा या मागणीसाठी डोईफोडे यांची भेट घेण्यात आली. सटाणा शहरात पालिकेकडून लॉकडाउनचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्यात आले आहे. शहरात प्रत्यक्ष एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही. शहराला लागून असलेल्या भाक्षी ग्रामपंचायत हद्दीत एक पोलीस अधिकारी बाधित असल्याचे पुढे आले. तेही कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत सटाणा शहर तसेच संपूर्ण बागलाण तालुका कोरोनामुक्त बनला आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लॉकडाउनची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करताना गेल्या साठ दिवसांपासून शहरातील सर्व व्यापार, उदीम, सेवा बंद करण्यात आल्या आहेत.--------जीवनावश्यक वस्तू व मेडिकलसाठीसुद्धा शहरात ठरावीक वेळेचे बंधन घालून देण्यात आले आहे. परंतु यामुळे मात्र दुसरीकडे छोट्यामोठ्या उद्योग, व्यवसाय व त्यांच्याशी संबंधित हजारो शहरवासीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार मुंबई, पुणे महानगरपालिका क्षेत्रात ज्या वसाहतीत किंवा मोहल्ल्यात बाधित असेल, तेवढी इमारत किंवा मोहल्ला फक्त प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर भागातील सर्व दैनंदिन व्यवहार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. याच धर्तीवर सटाणा शहरासाठीही एकही कोरोनाबाधित नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व दैनंदिन व्यवहार सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक