नाशिक : शहर व परिसरातील वाहतूक आदर्श वाहतूक ठरावी आणि रस्ता सुरक्षा अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, यासाठी विविध सामाजिक संस्थांपासून तर शहर वाहतूक शाखेपर्यंत सर्वांकडून विविध प्रकारे प्रबोधन करण्यात आले. मात्र, तरीही वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नाशिककरांमध्ये जागरूकता आलेली दिसत नाही. यावर्षी मेअेखरपर्यंत सुमारे ८३ हजारांपेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांना विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. एकीकडे नियमांचे उल्लंघन करणे तर दुसरीकडे दंडाची रक्कम थकविण्याचेही प्रमाण अधिक आहे.
शहर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात असली तरी या कारवाईतून वाहनचालकांनी शहाणे होत सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत वाहतुकीचे नियम पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मात्र, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. सुसाट वेगाने वाहने चालविणे, वाहन चालविताना सीटबेल्ट न वापरणे, मोबाइलचा सर्रास वापर, सिग्नल न पाळणे, नो-एन्ट्रीमधून वाहने टाकून शॉर्टकट शोधणे, मद्यप्राशन करत वाहने दामटविणे, अशा एक ना अनेक प्रकारे वाहतूक नियमांचा भंग वाहनचालकांकडून दिवसेंदिवस वाढतच असल्याने दंडात्मक कारवाईचे आकडेही मोठे होऊ लागले आहेत.
--इन्फो--
सुसाट वेगावर नियंत्रण नाहीच; सर्वाधिक दंड
१) नाशिक शहर व परिसरातील अंतर्गत व मुख्य रस्ते अन्य शहरांच्या तुलनेत बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असून ते प्रशस्तदेखील आहेत. याचाच गैरफायदा घेत काही दुचाकी व चारचाकी वाहनचालक वेगमर्यादेचे उल्लंघन करत बेफामपणे वाहने दामटविताना दिसतात.
२) सुसाट वेगाने वाहन चालविल्यास मोटार वाहन कायद्यानुसार शहर वाहतूक पोलिसांकडून १००० रुपयांचा दंड केला जातो. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) ५ हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
३) सुसाट वेगाने वाहन चालविण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकीस्वार दुभाजक, रस्त्यांलगतच्या झाडांवर जाऊन आदळण्याच्या घटना दररोज कुठल्या तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडतात. या अपघातांत डोक्याला गंभीर दुखापत होऊन दुचाकीचालकांचा मृत्यूही होतो, तर काही गंभीर जखमी होतात.
----इन्फो--
लवकर दंड न भरल्यास; लायसन्सचे निलंबन
दंडाची थकीत रक्कम लवकर न भरल्यास शहर वाहतूक शाखेकडून आरटीओकडे संबंधित वाहनचालकाचा परवाना रद्द करण्याबाबत प्रस्तावदेखील पाठविला जाऊ शकतो. तत्पूर्वी वाहतूक शाखेकडून नोटीस बजावण्यात येते. मात्र, वारंवार नोटिसा देऊनदेखील वाहनचालक दंडाची रक्कम अदा करत नसेल तर पुढील कारवाई होऊ शकते. चालू वर्षी मेअखेरीस विविध वाहतूक नियमांच्या उल्लंघन केल्याप्रकरणी ९१ वाहनचालकांचे प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे पाठवून वाहन परवाना निलंबित केला आहे.
---चौकट---
२०२१ मधील आकडेवारी काय सांगतेय
थकबाकी दंडाची रक्कम : ३,४७,५५,९००
भरलेला दंड- ८२,९४००
एकूण दंडाची रक्कम- ४,२९,६५,३००
-----
व्यक्तींनी दंड भरलाच नाही - ७३,२६६
व्यक्तींनी भरला दंड - ९७९६
जणांनी तोडला नियम- ८३०६२
----आलेख----
वर्ष - २०२१ ----------- २०१९
विना हेल्मेट- ३१,३४,५०० --------- ७६०४०००
विना लायसन्स- १,३९५०० --------- १७४६००
ओव्हर स्पीड- २,१८३१००० ---------- १७७०००
मोबाइल वापर- ४,५१०००---------- ११९३५००
नो-पार्किंग- १६०१२००------------- ७५१९०००
ट्रिपल सीट- ५,१२२००------------- ८०२४००
फॅन्सी नंबर प्लेट- ४४,४००------------ ४५०००
म्युझिकल हॉर्न- १६०००------------ ११५००
080721\08nsk_22_08072021_13.jpg~080721\08nsk_23_08072021_13.jpg~080721\08nsk_25_08072021_13.jpg
वाहतुक नियम पायदळी तुडविले~वाहतुक नियम पायदळी तुडविले~वाहतुक नियम पायदळी तुडविले