शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
6
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
7
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
8
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
9
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
10
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
11
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
12
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
14
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
15
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
16
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
17
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
18
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
19
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
20
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

३५० प्रतिनिधींनी घेतले प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 23:41 IST

सिन्नर : पानी फाउण्डेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्फे सहभागी होण्यासाठी दुसऱ्या वर्षीही तालुक्यातील अनेक गावे सज्ज झाली आहेत. ८ एप्रिल ते २२ मेदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागासाठी ९२ गावांतील ३५० प्रतिनिधींनी जलसिंचन व स्पर्धेतून विविध तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

ठळक मुद्दे९२ गावांचा समावेश : सिन्नर तालुक्यात वॉटर कप स्पर्धेसाठी अनेक गावे सज्ज

सिन्नर : पानी फाउण्डेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्फे सहभागी होण्यासाठी दुसऱ्या वर्षीही तालुक्यातील अनेक गावे सज्ज झाली आहेत. ८ एप्रिल ते २२ मेदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सहभागासाठी ९२ गावांतील ३५० प्रतिनिधींनी जलसिंचन व स्पर्धेतून विविध तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.गतवर्षी मोठ्या प्रमाणात जलजागृती करूनही पानी फाउण्डेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये मोजक्याच गावांनी सहभाग नोंदवला होता. तथापि, ज्या गावांनी सहभाग घेऊन पाण्याचे महत्त्व जाणले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणखी काही गावांनी सज्जता दाखवली आहे.त्यामुळेच चांदवड तालुक्यातील कळमदरे, संगमनेर तालुक्यात म्हसवंडी तसेच राळेगणसिद्धी येथे स्पर्धेसंदर्भातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आता श्रमदान व मशीन कामांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेपूर्वी ३० गुणांची कामे ग्रामस्थ करून शकतात. त्यात शोषखड्डे घेणे, परसबाग बनविणे, वृक्षसंवर्धन करणे, वॉटर बजेट ठरवणे, जलबचतीचे काम करणे, आगपेटीमुक्त शिवार अभियान राबविणे आणि माती परिक्षण करणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे स्पर्धा काळातही करता येऊ शकतात.वॉटर कप स्पर्धेची जय्यत तयारी झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून जलसमृद्धीच्या दिशेने पाऊल टाकावे असे आवाहन पानी फाउंडेशनच्या टीमच्या वतीने करण्यात आले आहे. आठवडाभरात मोबाइल अ‍ॅप तसेच विहिरींची पातळी मोजण्याबाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याची माहिती समन्वयकांनी दिली. हिवरे, सोनांबे, पाटपिंप्री, पाटोळे, वडझिरे, कोनांबे, घोरवड व चिंचोली आदी गावांमध्ये टीमने पाणलोटाच्या कामांबाबत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी ४० गावांमध्ये एकदिवसीय शिबिरही घेण्यात आले आहे.