शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रेल्वेस्थानकातील कुलींच्या मदतीसाठी सरसावले कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:57 IST

रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहे. त्यांनी स्थानकावरील ४० कुलींना जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

ठळक मुद्देमनमाड : किराणा साहित्य वाटप; वाणिज्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहे. त्यांनी स्थानकावरील ४० कुलींना जीवनावश्यक वस्तू, धान्य व किराणाचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.रेल्वेस्थानक व येथून धावणाºया गाड्या आणि यातून प्रवास करणाºया प्रवाशांवर अवलंबून असलेल्या कुली या कष्टकरी लोकांची उपजीविका लॉकडाउनमुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. या वंचित घटकावर सध्या उपासमारीची वेळ आलीआहे. आपल्या स्थानकात काम करणाºया या कष्टकरी लोकांना संकट काळात मदत करण्यासाठी वाणिज्य विभागातील अधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला आहे. स्थानकावरील ४० कुली लोकांना आटा, तांदूळ, चहा, साखर, तिखट, मीठ, हळद, डाळी, खाद्यतेल, फळे, बिस्कीट याबरोबरच हॅण्डवॉश पाकिटांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाºयांच्या या उपक्रमामुळे परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.गुरुद्वारा अन्नछत्र समितीचा उपक्रममनमाड : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे निराधार बेवारस लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील गुरुद्वारा गुपतसर साहेब यांच्या वतीने या निराधार लोकांसाठी शहरातील विविध भागांमध्ये अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत सर्वत्र बंदची परिस्थिती सुरू राहील तोपर्यंत या बेघर लोकांना गुरुद्वाराच्या माध्यमातून अन्नदान करण्यात येणार असल्याचे गुरुद्वारा अन्नछत्र समितीकडून सांगण्यात आले. देशामध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातल्या रेल्वेस्थानकात निराधार, बेघर आणि मजूर या सर्वांवर उपासमारीची वेळ आली असल्याने सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. परमजित ठकराल, संदीप पाटील, मनजित सिंग, गौरव पंजाबी, आतिक कुरेशी, बबलू खान, आतिक शेख, अतुल आहेर, पापा जगताप आदी स्वयंसेवक या कामासाठी परिश्रम घेत आहे.

लोहमार्ग पोलिसांकडून मदतकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन सुरू असून सर्वत्र संचारबंदी आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात विविध ठिकाणी गोरगरीब, कामगार, मजूर राहतात. मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी त्यांना मदत केली आहे. लोहमार्ग पोलीस दलाचे निरीक्षक नवनाथ मदने व कर्मचारी यांनी शहरातील विविध भागातील गरजूंना त्यांची भूक भागवण्यासाठी बिस्कीट पुडे, फळे, पिण्याचे पाणी आदींचे वाटप केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न