एकलहरे : उद्योग जगला तर कामगार जगणार व कामगार जगला तरच युनियन जगणार याकरिता उद्योग आधी वाचवला पाहिजे. फ्रॅँचाईसीला आमचा विरोध आहे. भविष्यात येऊ घातलेल्या सोलर वीज निर्मितीसाठी कामगारांना प्रशिक्षित करून त्यात सामावून घेतले पाहिजे. ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराची कीड नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय कामगार महासंघाचे केंद्रीय महामंत्री शंकर पहाडे यांनी केले. एकलहरे वर्कर्स क्लबमध्ये भारतीय मजदूर संघ संलग्नित महाराष्टÑ राज्य कामगार महासंघाचा राज्यस्तरीय मेळावा व चर्चासत्रप्रसंगी पहाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे वित्त सचिव रवींद्र काडके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अध्यक्ष जयप्रकाश होळीकर, कार्याध्यक्ष विठ्ठल भालेराव, वसंत काळे, रामदास माहुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय अध्यक्ष जयप्रकाश होळीकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र काडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेत नव्याने प्रवेश करणाऱ्या कामगारांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विठ्ठल बागल यांनी केले. सूत्रसंचालन राहुल महाजन व आभार संतोष डगळे यांनी मानले. यावेळी सुरेश मोतीकर, एम. डी. पाटील, महादेव पराते, श्रीधर मुळाणे, एस.एस. वाणी, पी.डी. जाधव, गणेश साळुंके, तुकाराम गावित यांच्यासह पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.अडचणींवर चर्चामहानिर्मिती कंपनी अंतर्गत येणाºया अडचणींवर चर्चा करण्यात आली. वीज कंपन्यातील मेडिक्लेम पॉलिसीबाबत संघटनेला विश्वासात न घेता कामगारांच्या पगारातून परस्पर पैसे कापून घेणे हे चुकीचे आहे. महानिर्मितीची उत्पादन क्षमता, खासगीकरण, गुणवत्ता धोरण, कालानुरूप होणारा बदल आदी विषयांबरोबरच महानिर्मिती कंपनी आव्हानांवरही चर्चा करण्यात आली.
वीज कामगारांना प्रशिक्षित करण्यात यावे : शंकर पहाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:50 IST