शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात होमगार्डच्या धर्तीवर ‘ट्रॅफिक वॉर्डन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:36 IST

शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी होमगार्डच्या धर्तीवर ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, लवकरच प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

नाशिक : शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी होमगार्डच्या धर्तीवर ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, लवकरच प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. राज्यामध्ये होमगार्डच्या धर्तीवर ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याबाबत आमदार जयवंत जाधव यांच्या मागणीनुसार राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी डॉ. रणजीत पाटील यांनी सदर माहिती दिली. बैठकीप्रसंगी बोलतांना जयवंत जाधव यांनी सांगितले, राज्यामध्ये मुंबई, पुणे, नांदेड, जळगाव, रायगड, लातूर, कल्याण, भंडारा इत्यादी शहरांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करत आहेत. नाशिक शहरातसुद्धा पोलीस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वितरित करून ट्रॅफिक वॉर्डन योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. त्यांना ट्रॅफिकचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे प्रशिक्षणही देण्यात आलेले होते.  मात्र २००९ नंतर ही योजना शहरात बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. चर्चेनंतर डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले, नाशिक शहरामध्ये ट्रॅफिक वार्डनची सेवा देता येणे शक्य आहे. त्यासाठी लवकरच ट्रॅफिक वॉर्डनची गरज लक्षात घेऊन त्यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रस्ताव तयार करून गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दंडाच्या वसुलीतून मानधननाशिक शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व वेगाने वाढणारी वाहनांची संख्या यांचा विचार करून, वाहतुकीच्या नियमनासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करून या कर्मचाºयांना ट्रॅफिक विभागातील दंडाच्या वसुलीतून मानधन देण्यात यावे, अशी मागणी आ. जयवंतराव जाधव यांनी यावेळी केली.