शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

शहरात प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅफिक वार्डन

By admin | Updated: June 19, 2017 19:13 IST

रणजीत पाटील : नियमावली करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक शहरात वाढत्या रहदारीचे नियोजन करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत ट्रॅफिक वार्डनची योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यासाठी गृह विभागाला नियमावली करण्याचे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत. होमगार्डच्या धर्तीवर नाशिक शहरात ट्रॅफिक वार्डन (वाहतूक मदतनीस) योजना राबविण्याबाबत मंत्रालयात डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी राज्यात ठाणे व नांदेड आदी शहरांमध्ये ट्रॅफिक वार्डन हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करत आहेत. नाशिक शहरातदेखील ५ सप्टेंबर २००४ रोजी पोलीस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करून ट्रॅफिक वार्डन योजना सुरू केली गेली होती. त्यांना ट्रॅफिकचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे ९० दिवसांचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. मात्र २००९ नंतर ही योजना बंद करण्यात आल्याची बाब आमदार जयंत जाधव यांनी निदर्शनास आणून दिली. नाशिक शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या व वेगाने वाढणारी वाहनांची संख्या याचा विचार करून वाहतुकीच्या नियमनासाठी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली. त्यावर डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले की, अमृत शहर अभियान आणि स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असणाऱ्या सर्व शहरांमध्ये ट्रॅफिक वार्डनची सेवा देता येणे शक्य आहे. त्यासाठी गृह विभागाकडून नियमावली तयार करण्यात येईल. तत्पूर्वी नाशिक शहरात प्रायोगिक तत्त्वावर ट्रॅफिक वार्डनची योजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अतिरिक्त पोलीस महासंचालक (परिवहन) आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्त (परिवहन) अमिताभ कुमार, अतिरिक्त महामार्ग पोलीस आयुक्त विजय पाटील, महाराष्ट्र ट्रॅफिक वार्डन असोसिएशनचे समन्वयक संतोष शेलार आदी उपस्थित होते.