शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नदीवरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहतुक असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:19 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.

ठळक मुद्देमृत्यूचा सापळा : नागरीकांच्या जीवाला निर्माण झाला धोका

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलाला संरक्षण कठडा नसल्याने नागरीकांच्या जीवास धोका निर्माण झालेला आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. याबाबत वारंवार मागणी करु नही याकडे पांटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याने येथील नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बंधार्यावर संरक्षण कठडा बांधुन तेथील नागरीकांना न्याय देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊले उचलावीत.या धरणाच्या पुलावरु न येथील परिसरातील विद्यार्थी, शेतकरी ये-जा करज असतात. परंतु या धरणावर संरक्षण कठडाच नसल्याने जीव मुठीत धरु न येथुन वावर करावा लागत आहे. शेतकामासाठी लागणारे मजुर तसेच शाळकरी विद्यार्थी याच पुलावरु नियमित ये-जा करत असतात.मागील महिन्यात येथे एक ९ वर्षाचा शाळकरी मुलगा बुडुन मृत्यु पावलेला आहे. सदरचे कुटुंब आदीवासी असल्याने त्यांची दखल कोणत्याही प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे या बंधाºयावर तात्काळ संरक्षण कठडा बांधण्यात येणे गरजेचे आहे.सद्या पावसाळाचे दिवस असल्याने नदीला पुर आल्यानंतर येथुन ये-जा करणे अत्यंत जिकीरीचे होणार आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर संरक्षण कठाडे बसवुनधोका दूर करावा अशी मागणी केली जात आहे.पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे येथुन ये-जा करणाºया शाळकरी विद्यार्थी, शेतमजुर, रहिवाशी यांच्या जीवीतास धोका निर्माण झालेला असल्याचे ग्रामस्थ भिती व्यक्त करीत आहेत.पुलाला संरक्षण कठडे नसल्याने वाहनधारकांचा ऐन पावसाळ्यात जीव टांगणीला लागला आहे. सध्या पावसाळा सुरू असून नदी-नाल्यांना पावसानंतर केव्हाही पूर येऊ शकतो. असे असताना कठडे नसलेल्या पुलावरून जाताना विशेषत: पायी दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागतो. कहर म्हणजे अरुंद, कठडे नसलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक फलक देखिल लावलेले नाहीत. त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाटबंधारे विभाग, नांदुरमध्यमेश्वर येथील अधिकारी वर्गास वारंवार याबाबत कळवुनही या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. कठड्यअभावी जर एखादी दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी पाटबंधारे विभाग जबाबदार राहील. पुढील दिवसांत या बंधाºयावर संरक्षण कठड्याचे कामकाज पुर्ण केले नाही तर आम्ही ग्रामस्थ रस्तयावर उतरु.- विजय गिते, माजी उपसरपंच, खेडला.(फोटो १७ खेडलेझुंगे, १७ खेडलेझुंगे१)