शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दोनच चौकांत वाहतूक सुरक्षिततेचे धडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:02 IST

शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहर पोलिसांतर्फे स्मार्ट वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू झाले़ त्यासाठी प्रायोजकांच्या सहकार्यातून शहरातील सुमारे सतरा चौकांचे सुशोभिकरण केले जाणार होते़ मात्र, शहरातील शरणपूररोड व त्रिमूर्ती चौक या दोनच चौकांचे स्मार्ट वाहतुकीसाठी सुशोभिकरण करण्यात आले असून, या सिग्नलवरील पिवळ्या तसेच हिरव्या पट्ट्यांचा नेमका अर्थ काय? वाहनधारकांनी केव्हा व कोठे थांबायचे? याबाबत वाहनचालक अनभिज्ञ असल्याचेच समोर आले आहे़ दरम्यान, शहरातील इतर प्रमुख चौकांच्या सुशोभिकरणाचे घोडे कोठे अडले, असा प्रश्न निर्माण झाला आहे़

नाशिक : शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर शहर पोलिसांतर्फे स्मार्ट वाहतुकीसाठी प्रयत्न सुरू झाले़ त्यासाठी प्रायोजकांच्या सहकार्यातून शहरातील सुमारे सतरा चौकांचे सुशोभिकरण केले जाणार होते़ मात्र, शहरातील शरणपूररोड व त्रिमूर्ती चौक या दोनच चौकांचे स्मार्ट वाहतुकीसाठी सुशोभिकरण करण्यात आले असून, या सिग्नलवरील पिवळ्या तसेच हिरव्या पट्ट्यांचा नेमका अर्थ काय? वाहनधारकांनी केव्हा व कोठे थांबायचे? याबाबत वाहनचालक अनभिज्ञ असल्याचेच समोर आले आहे़ दरम्यान, शहरातील इतर प्रमुख चौकांच्या सुशोभिकरणाचे घोडे कोठे अडले, असा प्रश्न निर्माण झाला आहे़  स्मार्ट सिटीतील शहरातील वाहतूकही स्मार्ट व्हावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे स्मार्ट नियोजन केले होते़ त्यानुसार प्रारंभी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना शहरातील सुमारे सतरा प्रमुख चौक दत्तक घेण्यास सांगण्यात आले होते़ दत्तक घेतलेल्या चौकांचे प्रायोजकांच्या माध्यमातून सुशोभिकरण तसेच सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, वळण, ना थांबा क्षेत्र अशी विविध चिन्हे काढण्यात येणार होती़ यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना सुलभ होईल तसेच वाहतूक नियमांचे पालनही केले जाईल, असा यामागील हेतू होता़  पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार सर्वप्रथम शहरातील शरणपूर पोलीस चौकीजवळील सिग्नल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, वळण, ना थांबा क्षेत्र अशी विविध चिन्हे काढण्यात आली़ मात्र, या चिन्हांचा अर्थ वाहनधारकांना ना पोलीस यंत्रणेने समजावून सांगितला ना वाहनधारकांनी समजावून घेण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे सिग्नलवरील हे उभे-आडवे रंगांचे पट्टे नेमके कशाचे हे वाहनधारकांना माहितीच नसल्याने वाहतूक नियमांचे पालन करणे तर दूरचीच गोष्ट़  पोलीस आयुक्तांनी निवडलेल्या सतरा प्रमुख चौकांपैकी केवळ दोनच चौक यानुसार करण्यात आले आहेत़ त्यामुळे उर्वरित पंधरा चौकांचे काम कधी पूर्ण होणार? होणार की नाही याबाबत साशंकताच आहे़रंगांच्या चौकटीचा अर्थ कायसिग्नलच्या चौकात पिवळ्या रंगाने ज्या चौकटी आखण्यात आल्या आहेत त्यावर कोणालाही वाहन थांबविता येणार नाही़सिग्नल यंत्रणेतील हिरवा दिवा बंद होऊन पिवळा असेल तोपर्यंतच या पिवळ्या चौकटींवरून वाहने नेता येणाऱ सिग्नल लाल झाल्यास वाहनचालकांना या पट्ट्यावर थांबता येणार नाही.  सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या मागेच वाहने थांबवावी़ सिग्नलवरील फ्री लेफ्ट भागात पिवळ्या रंगाचे पट्टे मारले असून त्या जागी कोणत्याही प्रकारचे वाहन पार्क करता येणार नाही़

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस