शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात वाहतूक नियम धाब्यावर; ८२ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

कोरोनाची दुसरी लाट शहरात फेब्रुवारी महिन्यात वेगाने पसरण्यास सुरुवात झाली. यानंतर हळूहळू शहरात निर्बंध कडक केले गेले. फेब्रुवारी ते ...

कोरोनाची दुसरी लाट शहरात फेब्रुवारी महिन्यात वेगाने पसरण्यास सुरुवात झाली. यानंतर हळूहळू शहरात निर्बंध कडक केले गेले. फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. सुमारे ८३ हजार ६२ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. विना हेल्मेट, विना सीटबेल्ट वाहन चालविणे, ओव्हरस्पीड वाहतूक, मोबाइलचा वापर, सिग्नल न पाळणे, विना परवाना वाहतूक, नो-पार्किंग, काळ्या काचा अशा अनेकविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाचे निर्बंध कडक असतानाही शहरात सर्रास वाहनचालकांची चलती होती. या काळात सुमारे चारशेहून अधिक वाहनचालकांनी सिग्नलचे पालन करणे टाळल्याचे दिसून आले.

---इन्फो--

‘ओव्हरस्पीड’चा सर्वाधिक दंड

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रस्त्यांवरील वाहतूक बऱ्यापैकी कमी झाल्याने रस्ते मोकळे मिळाल्याने बहुतांश वाहनचालक सुसाट वाहने दामटवित होते. जानेवारीपासून मेअखेरपर्यंत ओव्हरस्पीड वाहने चालविणाऱ्या २१ हजार ७०० लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून ५ लाख तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. २ कोटी १३ लाख २८ हजारांचा दंड थकीत आहे. प्रत्येकी हजार रुपये इतका दंड ओव्हरस्पीडचा नियम मोडल्यास केला जातो.

---इन्फो--

दोन हजार लोकांना मोबाइलचा मोह

वाहन चालविताना मोबाइलचा वापर करू नये, असा नियम असतानाही सर्रास दुचाकी, चारचाकी चालकवाहन चालविताना मोबाइलवर संवाद साधताना नजरेस पडतात. कोरोनाकाळातसुद्धा हा कित्ता बहुतांश वाहनचालकांनी गिरविला. सुमारे २ हजार २५५ वाहनचालकांनी मोबाइलचा वापर वाहतूक करताना केल्याचे आढळून आले. त्यापैकी ४४५ वाहनचालकांकडून ८९ हजारांचा दंड वसूल केला गेला आहे, तसेच १ हजार ८१० बेजबाबदार वाहनचालकांकडून ३ लाख ६२ हजारांच्या दंडाची रक्कम येणे शिल्लक आहे.

---आलेख----

विना हेल्मेट- ३,१३,४,५००

विना सीटबेल्ट- ९,९५,२००

नो-पार्किंग- १,६०,१२००

मोबाइलवर बोलणे- ४,५१०००

विना लायसन्स- १२,०००

ट्रीपल सीट- ५,१२,२००

विना वाहन विमा- २,३००

फॅन्सी नंबर प्लेट-६,६००

काळ्या काचा- १,९९,४००

===Photopath===

210621\21nsk_14_21062021_13.jpg

===Caption===

वाहतुक शाखेचा दंड