शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीचे खापर मनपाच्या माथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:13 IST

मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.

ठळक मुद्देवाहतूक शिस्त जबाबदारी कुणाची? : पोलीस आयुक्तांनी मांडल्या वाहतुकीच्या समस्या

नाशिक : मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे.नियोजन समितीमध्ये शहरातील पोलीस यंत्रणेच्या सादरीकरण दरम्यान पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी वाहतूक कोंडीला केवळ पोलीस यंत्रणा जबाबदार नाही तर शहराच्या नियोजनदेखील असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.१९ लाख लोकसंख्येच्या नाशिक शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी केवळ अडीचशे वाहतूक पोलीस पुरेसे नाहीत. ट्रॅफिक वॉर्डन देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला तर सिग्नलवरी यंत्रणा सुरळीत करता येऊ शकेल. एकट्या द्वारका चौकात सहा वाहतूक पोलीस द्यावे लागतात याकडेदेखील लक्ष वेधले.शहरात रिक्षांची आवश्यकता केवळ १२ हजारांपर्यंतच आहे, परंतु २३ हजारांपेक्षा अधिक रिक्षा धावतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना आपली वाहने वापरावी लागतात, असा दावा पोलीस आयुक्तांना केला आहे.वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या कोंडीला मनपाचे नियोजन जबाबदार असल्याकडेच पोलीस आयुक्तांनी बोट दाखविले.उपाययोजना करण्याची सूचनासादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी वाहतूक सुरक्षिततेसबाबतचा मुद्दा उपस्थित करताना स्मार्ट सिटीतून सुरक्षिततेसाठीच्या उपायोजना करण्याचीदेखील सूचना केल्याने महापालिकेनेच आता वाहतूक नियंत्रणाची जबादारी पार पाडावी असा अर्थ त्यातून काढला जात असेल तर मग पोलीस यंत्रणा नेमके काय करणार अशी चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस