नाशिकरोड : अत्यंत रहदारीच्या असलेल्या बिटको चौकाच्या चहूबाजूला पदपथमुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. बिटको चौकाच्या चहूबाजूला व्यावसायिक संकुल आहेत. मात्र रस्त्याच्या दुतर्फा चुकीच्या पद्धतीने व मोठ्या उंचीचे बनविलेल्या पदपथमामुळे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना आपली वाहने पदपथच्या बाहेर रस्त्यावर लावावी लागतात. यामुळे दिवसभर वाहतूकीची कोंडी होऊन वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे हॉर्नचा गोंगाट होत असल्याने त्याचा देखील त्रास होत आहे. मनपा व वाहतूक शाखेने एकत्रित नियोजन करणे गरजेचे झाले आहे.
बिटको चौकात वाहतुकीचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:29 IST