शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा-पाथर्डी रस्त्यावर लॉन्समुळे वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:56 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनामुळे होणाºया वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी सदर रस्ता लॉन्स व मंगल कार्यासाठी असून, वाहतुकीसाठी नाही, असा फलक लावण्याची उपरोधक मागणी केली आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयाच्या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनामुळे होणाºया वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांनी सदर रस्ता लॉन्स व मंगल कार्यासाठी असून, वाहतुकीसाठी नाही, असा फलक लावण्याची उपरोधक मागणी केली आहे.सुमारे पंधरा वर्षांत दोन टप्प्यांत वडाळानाका ते पाथर्डीगाव, असा वडाळा-पाथर्डी नागपूर पॅटर्नचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्त्या करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर पक्के बांधलेले ओटे आणि पत्र्याचे शेड हे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केली त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले तसेच वाहनांवर नियंत्रण राहावे आणि समोरासमोर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. त्या दुभाजकांमध्ये खजूर व शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे.या संदर्भात संबंधित विभागाला निवेदन आणि समक्ष भेटून तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.वाहने रस्त्यावरचया रस्त्यालगतच दहा ते बारा लॉन्स व मंगल कार्यालये उभी राहिली असून, त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने ज्या दिवशी विवाह सोहळा असतो त्यादिवशी रस्त्यावरच तासन तास लहान, मोठी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेक वेळेस लहान-मोठे अपघात घडतात.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी