पाथरे : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या देवपूर हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात वेशभूषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध रंगी व ढंगी पोशाख परिधान करून पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीचा अनोखा मिलाप साधला.मराठी, गुजराथी, बंगाली, मारवाडी, दाक्षिणात्य, काश्मिरी आदि संस्कृतीचे दर्शन घडविणारी वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. मुले फेटा, धोतर तर मुली नऊवारी साडीत वावरत होत्या. साधू, वारकरी, डॉ. बाबासाहेब व रमाबाई आंबेडकर, महात्मा गांधी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, गोंधळी, राधा, गोपिका आदिंसह विविध धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक वेशभूषा साकारून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. ललित शिरोळे, तेजस कातकाडे, अमित गायकवाड, माजीद मनियार, हर्षल खैरनार, सिद्धार्थ महाडिक, शुभम गडाख, नीलेश गडाख, साहिल गडाख, करण साळवे, कविता गडाख, शीतल गडाख, आरती गडाख, मृणाली उदावंत, ज्ञानेश्वरी गोसावी, सिद्धी शिरोळे, सोनाली घोटेकर या विद्यार्थ्यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली.मुख्याध्यापक सुनील गडाख, सुनील पगार, शंकर गुरुळे, बी. सी. कुमावत, दत्तात्रय आदिक, मीननाथ जाधव, श्रीहरी सैंद्रे, राजेश अहेर, भीमराव अढांगळे, विलास पाटील, प्रमोद बधान, गणेश मालपाणी, ताराबाई व्यवहारे, रवि गडाख, एन. जे. खुळे, रवि गडाख, सोपान गडाख, अशोक कळंबे, नारायण भालेराव, सतीश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
देवपूर विद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन
By admin | Updated: January 7, 2017 00:46 IST