शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे येथील बाजारात १३ आठवड्यांपासून व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:29 IST

नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे.

नांदूरशिंगोटे : कोरोनामुळे आठवडे बाजार बंद झाल्याने ग्रामपंचायतींना लाखो रुपयांच्या करवसुलीवर पाणी सोडावे लागले आहे. तालुक्यातील दहा ते बारा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील आठवडे बाजार १३ आठवड्यांपासून ठप्प असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठ व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर झाला आहे. देशात व राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्यातआली आहेत. गावोगावी भरणारे आठवडे बाजार पहिल्या लॉकडाऊनपासून बंद करण्यात आले आहेत.सिन्नर तालुक्यातील ठाणगाव, दापूर, चास, नांदूरशिंगोटे, गुळवंच, पंचाळे, वावी, पाथरे बुद्रुक, वडांगळी, शहा, नायगाव, सोमठाणे आदी बारा गावांत आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी बाजार भरत असतो. आठवडे बाजाराच्या माध्यमातून काही ग्रामपंचायतींना लिलावाच्या माध्यमातून करवसुली करतात. या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूल ग्रामपंचायतींना मिळतो.या निधीच्या माध्यमातून विकासाची कामे ग्रामपंचायतींना करता येतात. मात्र लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार भरले नाही. त्यामुळे करवसुलीवर ग्रामपंचायतीला पाणी सोडावे लागले.------------------स्थानिक व्यावसायिकांना फटकानांदूरशिंगोटेचा दर शुक्र वारी आठवडे बाजार असतो. तसेच त्याच दिवशी येथील उपबाजारात कांद्याचा व धान्य, भुसार मालाची खरेदी-विक्र ी केली जाते. परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने पंधरा ते वीस गावांचा येथे बाजाराच्या निमित्ताने संपर्क असतो. येथील आठवडे बाजारात दर शुक्र वारी लाखो रु पयांची उलाढाल होते. परिसरातील ग्राहक येथे बाजारासाठी येत असतात; पंरतु गेल्या तीन महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने त्याचा फटका स्थानिक व्यावसायिकांनाही बसला आहे. अद्यापही छोटे-मोठे दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत गर्दी कमी आहे.नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजाराचा लिलाव दरवर्षी चढ्या दराने जात होता. दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव केला जात होता. परंतु यावर्षी कोरोनामुळे लिलाव करण्याची वेळच आली नाही. लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद झाला. परंतु गावातील काही आस्थापना बंद असल्याने त्याच्या पट्ट्या येणे बंद झाले आहे. मध्यंतरी लोकांना रोजगार नसल्याने घर व पाणीपट्टी वसुली होत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nashikनाशिक