शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव घरपट्टीच्या विरोधात  व्यापारी, उद्योजकही एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:41 IST

महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या असून करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरविण्यात आले.

ठळक मुद्देवाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या करवाढीवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन मंगळवारी महापौरांना निवेदन दिले जाणार

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आता व्यापारी, उद्योजक संघटनाही एकवटल्या असून करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) महापौर रंजना भानसी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरवि-ण्यात आले.  महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अग्रीकल्चर नाशिक शाखेच्या वतीने करवाढीवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निमा, आयमा, लघु उद्योग संस्था, नाशिक धान्य किराणा संघटना, सीपीआय नाशिक, जीपीव्हीएस अशा विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीचा निषेध नोंदवण्यात आला. लोकप्रतिनिधी, औद्योगिक संस्था व व्यापारीवर्गाला कोणतीही पूर्व कल्पना न देता घेतलेला घरपट्टी वाढीचा निर्णय चुकीचा व अन्यायकारक असल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स घरपट्टी वाढीसंदर्भात जो काही निर्णय घेईल त्यास हॉटेल असोसिएशनचा पाठिंबा असेल अशी ग्वाही संजय चव्हाण यांनी दिली. घरपट्टी व त्यातील वाढीच्या संदर्भात तांत्रिक बाबींची माहिती नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी सभासदांना दिली. मंगळवारी महापौरांना निवेदन दिले जाणार आहे. करवाढ रद्द न झाल्यास नाशिककरांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली. बैठकीला काँग्रेसचे शरद अहेर, अनिलकुमार लोढा, अनूज सिंगल, विजय कुलकर्णी, स्वप्नील जैन, सुरेश चावला, मिलिंद कुलकर्णी, प्रल्हाद सूर्यवंशी, सोनल दुग्गड, अजित सुराणा, राजेश मालपुरे, विजय काकड, सचिन पाटील, बिपीन पटेल, शेखर दशपुते, प्रभाकर गाडे आदी उपस्थित होते.करवाढ कमी होण्याचे संकेतमहासभेने ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंत मिळकत करात दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सदर करवाढ कमी करण्याच्या सूचना महापौरांना दिल्याचे समजते. त्यामुळे, माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्थायी समितीला पाठविलेला १८ टक्के दरवाढीचाच प्रस्ताव मंजूर करून तो प्रशासनाकडे पाठविला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, स्थायीच्या ठरावात बदल केल्याप्रकरणी विरोधकांनी न्यायालयातही दाद मागण्याची तयारी चालविली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका