शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुग्णालय असुविधांच्या ट्रॅकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 01:05 IST

मनमाड : विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देणारे मध्य रेल्वे रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रुग्णालयाचा कारभार अवघे एक वैद्यकीय अधिकारी व तीन नर्सच्या भरोशावर सुरू असून, पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले असल्याने असुविधांच्या ट्रॅकवर असलेल्या या रुग्णालयामुळे रेल्वे कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देमनमाड । पॅथॉलॉजी लॅबला टाळे; रेल्वे कर्मचाऱ्यांची गैरसोय, नागरिकांच्या तक्रारी

गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : विभागातील कर्मचाऱ्यांना आरोग्यसेवा देणारे मध्य रेल्वे रुग्णालय सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रुग्णालयाचा कारभार अवघे एक वैद्यकीय अधिकारी व तीन नर्सच्या भरोशावर सुरू असून, पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले असल्याने असुविधांच्या ट्रॅकवर असलेल्या या रुग्णालयामुळे रेल्वे कर्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मध्य रेल्वेचे जंक्शन स्थानक व रेल्वे पूल कारखान्यामुळे देशाच्या नकाशावर वेगळी ओळख असलेल्या या शहरात रेल्वे कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणावरील संख्या पहाता गेल्या ७५ वर्षांपूर्वी भव्य अशा रेल्वे रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. दिवसेंदिवस रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रुग्णलयाला आता अखेरची घरघर लागली आहे. तीन वैद्यकीय अधिकाºयांची मंजुरी असलेल्या या मोठ्या रुग्णालयाचा कारभार सध्या केवळ एकाच डॉक्टरच्या भरोशावर सुरू आहे. तीन परिचारिका येथे कार्यरत आहेत. या रुग्णालयात रक्त, लघवी, थुंकी तसेच अन्य चाचण्या करण्यासाठी प्रशस्त पॅथॉलॉजी लॅब होती. गेल्या काही वर्षांपूर्वी या प्रयोगशाळेला कुलूप लावण्यात आले. ही लॅब बंद केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तपासणीचे काम शहरातील खासगी पॅथॉलॉजी लॅबला दिले होते. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे सध्या ही सेवा बंद झाल्याने रक्त-लघवीच्या तपासणीसाठी रेल्वे कर्मचाºयांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. उगावपासून पानेवाडीपर्यंत पुणे मार्गावर अनकाई स्टेशनपर्यंतचे कार्यक्षेत्र असलेल्या या रुग्णालयावर तब्बल तीन हजार कर्मचाºयांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. एकेकाळी सुसज्ज व रुग्णसेवेसाठी राज्यात ख्याती असलेल्या या रुग्णालयाची आजची स्थिती अत्यंत दयनीय आहे. रुग्णालयात केवळ किरकोळ आजारांवर सुविधा मिळत आहेत.रेल्वे रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने येथे हृदयरोगासंबधी दाखल झालेल्या रुग्णांना येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र सध्या ती सुविधा बंद असल्याने रेल्वे कर्मचाºयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.मनमाड येथील रेल्वे रुग्णालयात रक्त- लघवी तपासणी सुविधा नसल्याने कर्मचाºयांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत संघटनेच्या वतीने रेल्वे महाप्रबंधकांकडे तक्रार करण्यात आली आहे.- सतीश केदारे, झोनल सचिव,एससी-एसटी रेल्वे एम्पलॉइज असो.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेhospitalहॉस्पिटल