शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

पोलिसांच्या मदतीने टोइंगचा ‘झोल’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:16 IST

शहरातील वाढती रस्ता वाहतूक व या वाहतुकीला अडथळे ठरणारे रस्त्यावरील अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका व नाशिक पोलीस आयुक्तालयाने नाशिककरांना सुरक्षित रस्ता वाहतुकीसाठी कोणतीही उपाययोजना न करता, उलट नागरिकांची आर्थिक पिळवणूक करून ठेकेदाराकरवी उच्छाद मांडला आहे.

नाशिक : शहरातील वाढती रस्ता वाहतूक व या वाहतुकीला अडथळे ठरणारे रस्त्यावरील अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका व नाशिक पोलीस आयुक्तालयाने नाशिककरांना सुरक्षित रस्ता वाहतुकीसाठी कोणतीही उपाययोजना न करता, उलट नागरिकांची आर्थिक पिळवणूक करून ठेकेदाराकरवी उच्छाद मांडला आहे. शहरातील मोजक्याच परंतु मध्यवस्तीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर अक्षरश: झडप घालून ताबा घेणारा वाहतूक ठेकेदार दररोज लाखो रुपयांना पोलिसांच्या संगनमताने नाशिककरांना गंडवित असून, वाहतूक नियमांचे पालन करणाºया वाहनचालकांना ‘टोइंगचा झोल’ आणखी किती दिवस सहन करावा लागेल, असा प्रश्न विचारला जात आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाने शहरातील कानाकोपºयातील रस्ता वाहतूक सुरळीत राहावी तसेच वाहतुकीला अडथळा आणणाºया वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांनी रस्त्यावर नो पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग केलेली वाहने टोइंगच्या माध्यमातून उचलूून आणण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. ठेकेदाराने वाहन उचलून ते थेट शहर वाहतूक शाखेच्या ताब्यात द्यायचे व तेथे टोइंग चार्ज तसेच वाहतूक नियमांचा भंग केल्याचा दंड भरून आपले वाहन ताब्यात घ्यायचे, असा त्यासाठी नियम आहे.  या कामासाठी वाहतूक ठेकेदार नेमताना पोलीस आयुक्तालयाने काही नियम निश्चित केले असतील; पण सामान्य नाशिककर व वाहनचालकांना माहिती कसे होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक ठेकेदाराचे चांगलेच फावले असून, त्याने व त्याने नेमलेल्या टोइंग कर्मचाºयांनी अक्षरश: धुडगूस घातल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या अगदीच कडेला उभे असलेली वाहने उचलणे, वस्तू खरेदी करण्यासाठी वाहन उभे करून दुकानात शिरण्यासाठी गेलेले वाहन अवघ्या मिनिटाच्या कालावधीत उचलणे, बसस्थानक, रिक्षास्थानकावर नातेवाइकांना सोडण्यासाठी आलेल्या वाहनांना टार्गेट करणे, अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या वाहनांवरही कारवाई करणे, दुकानांच्या आडोशाला उभ्या असलेल्या किंवा रहदारी नसलेल्या रस्त्यांवरील वाहने उचलणे अशा एक नव्हे तर अनेक प्रकारचे नियमभंग करून वाहतूक ठेकेदार कारवाई करीत आहे. विशेष म्हणजे, ज्यांना वाहतुकीच्या नियमांची व कायद्याची पुरेपूर जाणीव आहे असे समजले जाते त्या वाहतूक पोलिसांच्या समक्षच हा सारा प्रकार घडत असल्याने ठेकेदाराच्या या बेकायदेशीर कृत्याला पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचे लपून राहिलेले नाही.दररोज या बेकायदेशीर कृत्यातून वाहतूक ठेकेदार लाखो रुपयांची कमाई करीत असून, साहजिकच त्याच्या या कृत्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा त्यातून पावन होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळेच की काय ठेकेदाराच्या मनमानी, अरेरावी, शिवीगाळ यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना आवर घालण्याऐवजी त्याला मूक संमतीच दिली जात असल्याची उदाहरणे आहेत.वाहनांची मोडतोड,  गुंडगिरीचे प्रदर्शनरस्त्याच्या कडेला वाहन उभे दिसले तर झडप घालून ताब्यात घेणाºया टोर्इंग कर्मचाºयांची मुजोरी व दादागिरी इतक्या पराकोटीला गेली आहे की, वाहने उचलून वाहनात ठेवताना अक्षरश: त्याची मोडतोड केली जाते. अनेक वाहनांचे आरसे, हेडलाइट फुटणे, हॅण्डल वाकणे, हॅण्डल लॉक तोडणे, साइड स्टॅण्ड वाकणे, क्लच तुटणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. याशिवाय मोपेडच्या फायबर बॉडीचे पार्ट तुटणे, वाहनांचा रंग घासणे जाणे, पेट्रोलच्या टाकीवर चरे पडणे हे प्रकार घडतात. हे कमी की काय म्हणून टोर्इंग केलेल्या वाहनावर एक नव्हे तर दोन दोन कर्मचारी कुदून बसतात. टोर्इंग करताना होणाºया नुकसानीबाबत वाहनचालकाने जाब विचारल्यास त्याला दुरुत्तरे देणे, दमदाटी करणे व प्रसंगी वाहतूक पोलिसाच्या नावे धमकी देण्याचे प्रकारही घडतात. वाटेतच तडजोडी,  मग कसली कारवाई?४टोइंग करून उचललेली वाहने अनेक वेळा कर्मचाºयांकडून रस्त्यातच पैसे घेऊन उतरवून देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. मग हे पैसे कोणाच्या खिशात जातात, असा प्रश्न विचारला जात आहे. रस्ता वाहतूक नियमांचा भंग केल्यावर दंड करण्याचे अधिकार जर पोलिसांना असतील तर त्या अधिकाराचा वापर करून उचललेले वाहन परस्पर सोडून देण्याचा अधिकार टोइंग कर्मचाºयांना कोणी दिला, असा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहिला आहे. अशा प्रकारातून शासनाच्या तिजोरीला सुरुंग लावण्याचा, तर ठेकेदाराच्या तुंबड्या भरण्याचा प्रकार पोलिसांच्या मदतीने केला जात असून, त्याची झळ मात्र सामान्य नागरिकांना बसत आहे. पोलीस आयुक्त शिस्तीचे व कायद्याचे भोक्ते असताना त्यांच्या अखत्यारित होणाºया या प्रकाराला त्यांचीही साथ आहे असे मानायचे काय, असा प्रश्न आता जनता विचारू लागली आहे. स्थळ- महात्मा गांधी रोडरस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांमध्ये असलेल्या तीन फूट जागेत एक दुचाकी उभी असते. वाहनचालक दुकानात वस्तू खरेदीसाठी दुकानाच्या पायºया चढत नाही तोच ठेकेदाराच्या कर्मचाºयांनी दोन चारचाकी वाहनांच्या मधोमध उभी असलेली दुचाकी अवघ्या मिनिटात उचलून टोइंग केली. वाहनचालकाने विचारणा केल्यावर रस्त्यावर गाडी का उभी केली, अशी उलट विचारणा कर्मचाºयाने केली. त्यावर दोन चारचाकी वाहने रस्त्यात उभी असताना त्यांच्यावर कारवाई का नाही केली, असे विचारल्यावर दुचाकीचालकाला पोलिसानेच दम भरत ‘नियम शिकवू नका, गाडी घ्यायला कार्यालयात या’ असे सुनावले. बिचारा दुचाकीचालक हात चोळण्यापलीकडे काहीच करू शकला नाही. स्थळ- कॅनडा कॉर्नरदुचाकीचालकाचे रस्त्यावर उभे केलेले वाहन गायब होते. दुचाकीचालक वाहनाचा शोध घेत असताना कोणीतरी निरोप दिला, ट्रॅफिकला विचारा. मग घाबरलेला दुचाकीचालक ट्रॅफिकचे कार्यालय वेळेत गाठण्यासाठी धावपळ करीत असताना कॅनडा कॉर्नरच्या रस्त्यावर त्याला त्याची दुचाकी एक व्यक्ती घेऊन जात असताना दिसते. तो त्याचा पाठलाग करून थांबवतो, तर त्याची बाजू ऐकून धक्काच बसतो. शहर वाहतूक शाखेच्या सेवेत कार्यरत असलेल्या टोइंग कर्मचाºयाने रस्त्याला अडथळा ठरली म्हणून दुचाकी उचलून नेली व अवघ्या काही वेळेतच दुचाकीला ग्राहक शोधून ती विक्रीही केली. हा सारा प्रकार दुचाकीच्या मालकाला कळताच काय करावे त्याला सुचेनासे झाले. ज्याने खरेदी केली त्याने मालकी हक्क सांगितला तर ज्याची उचलून नेली तोच चोर ठरविला गेला. स्थळ- कॅनडा कॉर्नरएक महिला आपल्या लहान मुलासह खरेदीसाठी बाजारात आलेली. मोपेड उभी करून वस्तू खरेदीसाठी दुकानात शिरते न शिरते तोच दुकानदार महिलेला सांगतो, ‘मॅडम तुमची गाडी उचलली.’ महिला आपल्या लहान मुलाला दुकानातच उभी करून टोइंगच्या वाहनाकडे धाव घेते व मोपेड ताब्यात देण्याची विनंती करू लागते. तोपर्यंत एखादे सावज सापडल्याच्या आविर्भावात टोइंगचे वाहन सुसाट वेगाने मार्गस्थ होते. सदर महिला त्या वाहनाच्या मागे धावते. आई धावते हे पाहून दुकानात उभा असलेला लहान मुलगाही रस्त्यावर आईच्या पाठीमागे धावत सुटला. भर रस्त्यात घडलेला हा प्रकार नागरिक उघड्या डोळ्याने पाहत तर होतेच, परंतु टोर्इंगचे कर्मचारी त्या महिलेची केविलवाणी अवस्था पाहून तिच्यावर घाणेरड्या शब्दांत ताशेरे ओढत होते.