शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभाग : वास्तुविशारदांनाच मिळणार अधिकार २०० चौ.मी.च्या बांधकाम आराखडा मंजुरीत सुलभता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:31 IST

शहरातील २०० चौरसमीटर अर्थात दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या इमारत बांधकाम आराखड्यास मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या स्तरावरच मंजुरी मिळणार असून, त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज भासणार नाही.

ठळक मुद्देआॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित आॅनलाइन प्रक्रिया सुरू प्रणालीत सुलभता आणण्याचे प्रयत्न

नाशिक : शहरातील २०० चौरसमीटर अर्थात दोन हजार चौरस फुटांपर्यंतच्या इमारत बांधकाम आराखड्यास मान्यताप्राप्त वास्तुविशारदांच्या स्तरावरच मंजुरी मिळणार असून, त्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. याबाबतची अधिसूचना पुढील सप्ताहात निर्गमित केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.महापालिकेने इमारत बांधकाम परवानग्यांसाठी नगररचना विभागात आॅटो डीसीआर प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. आतापर्यंत दाखल ५०० प्रकरणांपैकी १०७ प्रकरणे निकाली निघू शकली आहेत. परंतु, या आॅटो डीसीआर प्रणालीतील त्रुटींबाबत दी इन्स्टिट्यूशन आॅफ आर्किटेक्ट्सच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष प्रदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्तांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. आॅनलाइन प्रक्रिया सुरू असली तरी आॅफलाइन पद्धतीने कागदपत्रांची मागणी केली जात असल्याची तक्रार यावेळी वास्तुविशारदांनी केली. याशिवाय, नगररचना विभागात स्वतंत्र छाननी केंद्र उभारण्याची आणि वास्तुविशारदांना आॅटो डीसीआर प्रणालीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आॅटो डीसीआर प्रणालीत सुलभता आणण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी समितीही नियुक्त करण्यात आलेली आहे. शासनाच्या निर्णयानुसार, यापुढे २०० चौ.मी.पर्यंतच्या बांधकामाच्या आराखडा परवानगीसाठी नगररचना विभागात येण्याची गरज भासणार नाही. मान्यताप्राप्त वास्तुविशारदांमार्फतच सदर परवानगी घेता येईल. असे आराखडे मंजूर करण्याचे अधिकार वास्तुविशारदांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. त्यामुळे नगररचना विभागावर पडणारा ताणही कमी होण्यास मदत होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.