कसबे सुकेणे : येथील पोळा सण मानाप्रमाणे शेवकर बंधुंच्या बैलजोडीला वेशीतून सोडून पोळा फोडण्यात आला. कसबे सुकेणे येथील पोळा सणाला ब्रिटिशकालीन महत्त्व आहे. वेशीवरचा मानाचा पोळा सण या गावात साजरा होतो. यंदाही मानाप्रमाणे सुनील शेवकर व हिरामण सावळीराम शेवकर यांच्या बैलजोडीला मान देण्यात आला. पोळा सणाच्या दिवशी सकाळी विधिवत पूजा करीत वेस बंद करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता शेवकर बंधूंनी बैल जोडी पूजन केले. यावेळी बाळासाहेब जाधव, सरपंच छगन जाधव, बबन शेवकर, प्रकाश शेवकर, विश्वास भंडारे, संजय शेवकर, भाऊसाहेब भंडारे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
कसबे सुकेणेला साजरा झाला वेशीचा पोळा
By admin | Updated: September 2, 2016 00:23 IST