शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोइंग कर्मचाऱ्यांची महिलेस शिवीगाळ, वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:28 IST

दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यापूर्वी मुलाचा एक्सरे काढण्यासाठी महात्मा गांधी रोडवर आलेल्या महिलेची दुचाकी टोइंग वाहनात टाकल्यानंतर जागेवरच दंड भरण्यास तयार असतानाही टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, महिलेस शिवीगाळ होत असल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी टोइंगचे वाहन अडवून रास्ता रोको आंदोलन केले़

नाशिक : दवाखान्यात अ‍ॅडमिट करण्यापूर्वी मुलाचा एक्सरे काढण्यासाठी महात्मा गांधी रोडवर आलेल्या महिलेची दुचाकी टोइंग वाहनात टाकल्यानंतर जागेवरच दंड भरण्यास तयार असतानाही टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २७) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, महिलेस शिवीगाळ होत असल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी टोइंगचे वाहन अडवून रास्ता रोको आंदोलन केले़ या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी नागरिकांची समजूत घातली़ दरम्यान, टोइंगवरील कर्मचाºयांची दिवसेंदिवस दादागिरी वाढत चालल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़  मुलाला अ‍ॅडमिट करण्यापूर्वी एक्सरे काढण्यासाठी एक महिला रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या मुलाला दुचाकीवरून एमजी रोड परिसरातील एक्स-रे सेंटरमध्ये आली होती़ या महिलेने घाईघाईत आपली गाडी नो पार्किंगमध्ये उभी केली व एक्सरेसाठी मुलाला घेऊन गेली़ या कालावधीत टोइंगवरील कर्मचाºयांनी महिलेची गाडी उचलण्यास सुरुवात केली व योगायोगाने महिला आपल्या दुचाकीजवळ आली़ तिने नो पार्किंगमध्ये वाहन असल्याचे कबूल करून दंड जागेवर घेऊन दुचाकी देण्याची विनंती केली़ मात्र, टोइंग वाहनावरील कर्मचाºयांनी या महिलेस शिवीगाळ करीत दमदाटी सुरू केली़ यामुळे संबंधित महिला केविलवाण्या पद्धतीने हताश होऊन विनवणी करीत होती़ महात्मा गांधी रोडवरील काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच ते संतप्त झाले व त्यांनी जागेवर दंड भरून महिलेस वाहन देण्याची विनंती केली असता त्यांनी नागरिकांच्या विनंतीलाही जुमानले नाही़ अखेर नागरिकांचा टोइंग कर्मचायांच्या विरोधात संताप झाला व त्यांनी टोइंगचे वाहन अडवून अघोषित रास्ता रोको आंदोलन केले़ यामुळे महात्मा गांधी रोडवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली़ या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना कळताच ते कर्मचायांसह घटनास्थळी पोहोेचले़ त्यांनी नागरिकांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ यावेळी नागरिकांनी टोइंगवरील कर्मचायांविरोधात तक्रारी केल्या़बेशिस्त आणि उर्मटटोइंग वाहनावरील कर्मचायांच्या दादागिरीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत़ पोलिसांचा परवाना मिळाल्यागत टोइंग वाहनावरील टवाळ मुले रस्त्याने ये-जा करणाया महिला व मुलींवर शेरेबाजी करत असल्याचे प्रकार नाशिककर पाहत आहेत. या वाहनावरील टारगट मुले वाहनधारकांशी खुलेआम दादागिरी करीत असल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असतानाही पोलीस खात्याला मात्र काहीही एक सोयरसुतक नसल्याचे वारंवार समोर आले आहे. टोइंग वाहन हे वाहतूक शिस्तीसाठी आहे की टवाळांच्या मस्तीसाठी, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी