शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

‘टूर आॅफ ड्रॅगन’ सायकल स्पर्धेसाठी महाजन बंधू सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 17:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भूतान आॅलिम्पिक कमिटी यांच्यातर्फे सप्टेंबर महिन्यात भूतान येथे होणाºया ‘टूर आॅफ ड्रॅगन’ या जगातील सर्वांत कठीण आणि एकदिवसीय सायकल रॅलीसाठी नाशिकचे सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन आणि किशोर काळे रवाना होणार आहेत.सायकलचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच नागरिकांमध्ये सायकलविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भूतान आॅलिम्पिक कमिटी यांच्यातर्फे सप्टेंबर महिन्यात भूतान येथे होणाºया ‘टूर आॅफ ड्रॅगन’ या जगातील सर्वांत कठीण आणि एकदिवसीय सायकल रॅलीसाठी नाशिकचे सायकलपटू डॉ. महेंद्र महाजन, डॉ. हितेंद्र महाजन आणि किशोर काळे रवाना होणार आहेत.सायकलचा प्रचार, प्रसार व्हावा तसेच नागरिकांमध्ये सायकलविषयी गोडी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६८ किलोमीटरसाठी घेण्यात येणाºया या स्पर्धेला शनिवारी (दि. २) सप्टेंबरला पहाटे २ वाजता सुरुवात होणार आहे. समुद्र सपाटीपासून ८५६० फूट उंचीवर असणाºया चार उंच डोंगररांगा आणि दºया- खोºयांच्या परिसरात अत्यंत खडतर अशा मार्गावर ही स्पर्धा पार पडणार आहे. भूतान येथे होणाºया स्पर्धेच्या मार्गात सपाटीकरण नसून अधिकाधिक भाग हा डोंगरव्याप्त असल्याने या स्पर्धेत सगळ्याच सायकलपटूंचा कस लागणार आहे.भूतान येथील जकार टाउन येथून या रॅलीला सुरुवात होणार असून, पहिल्या टप्यात किकी - ला (२८७० मी), दुसºया टप्यात योतांग - ला (३४३४ मी), तिसºया टप्यात चेंदजेबी (२४४० मी), चौथ्या टप्यात पेले - ला (३४३० मी), आणि पाचव्या टप्यात डॉक्युला (३१५० मी) या डोंगररागातून या स्पर्धेचा मार्ग जाणार आहे. ४० ते ६० किमी उंच असलेल्या डोंगरावर चढणे हे जसे आव्हानात्मक आहे तसेच ६० ते ७० किमी वेगाने हे डोंगर उतरणे तेवढेच कठीण असणार आहे. अतिशय वेगात डोंगरावरून खाली येताना अनेकदा ब्रेकदेखील निकामी होतात. डोंगर चढताना थंड वातावरणात वाढ होणे आणि खाली येताना उष्ण वातावरण आणि अधून-मधून येणारा पाऊस यामुळे ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक आहे.