शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल एजंटच्या ठकबाजीचा फटका, मलेशियात अडकलेले नाशिकचे पर्यटक अखेर परतले

By संजय पाठक | Updated: November 10, 2022 20:01 IST

खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र शासनाची मध्यस्थी

नाशिक- ट्रॅव्हल्स एजंटच्या ठकबाजीमुळे मलेशियात अडकलेले  नाशिकचे पंधरा पर्यटक अखेरी नाशिकमध्ये सुखरूप परतले. नाशिकचे खासदर  हेमंत गोडसे यांच्या मध्यस्तीनंतर केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने मलेशिया एम्बेसी प्रशासनाशी पत्रव्यवहार करत मलेशिया पोलिसांच्या कस्टडीतून पंधरा पर्यटकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणले.

नाशिकमधील सुभाष ओहोळे, मिनाक्षी ओहोळे, अरूण भदरंगे, शांताबाई भदरंगे,धनाजी जाधव,सुनिल म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव,विमलभालेराव,मंदा गायकवाड,वृशाली गायकवाड,प्रविण नुमाळे,द्रोपदी जाधव,इंदूबाई रूपवते हे सर्व नाशिक  शहरातील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंट मार्फतमलेशिया येथे गेले होते.   हैदराबाद येथून चार जणांच्या विसाचे काम पूर्ण करून मलेशियाला येतो असे सांगून एजन्ट मलेशियात पोहोचलाच  नाही. त्यामुळे पर्यटक तेथे चिंतेत असतानाच  मलेशिया पोलिसांनी त्यांना हटकावले. आणि या सर्वांचे पासपोर्ट जप्त करून घेत त्यांना ताब्यात घेतले.

यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांना नाशिकच्या पर्यटकांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाल्यानंतर,  खासदार गोडसे यांनी लगेचच केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून मलेशियात अडकलेल्या पर्यटकांची माहिती दिली. त्यांनी मलेशिया एम्बेसी प्रशासनाशीया घटनेची माहिती कळवली.. त्यानंतर मलेशिया पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट परत करून त्यांना हैदराबादसाठीच्या विमानात बसवून देत मायदेशी पाठविले. सर्व पर्यटक नाशिकला पोहचले.

टॅग्स :Nashikनाशिक