शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यात केंद्रीय समितीचा दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:02 IST

चांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी प्रश्न यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याचे दर्शन या दौऱ्यात समितीच्या सदस्यांना झाले. ही समिती मनमाड कडून सायंंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यात कडोकोट पोलीस बंदोबस्तात आली.

ठळक मुद्देचांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा

चांदवड : चांदवड तालुक्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने गुरूवारी केली. हरनूल आणि हरसूल या दोन गावांमध्ये पथकाने शेतामध्ये जाऊन पाहणी केली. पावसाअभावी खरिपाचे झालेले नुकसान, भाजीपाल्याबरोबरच कांद्याचे कोसळलेले दर, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी प्रश्न यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्याचे दर्शन या दौऱ्यात समितीच्या सदस्यांना झाले.ही समिती मनमाड कडून सायंंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चांदवड तालुक्यात कडोकोट पोलीस बंदोबस्तात आली. केंद्रीय समितीमध्ये श्रीमती छाहवी झा, आर. डी. देशपांडे, अ‍े. के. तिवारी, डॉ. शालिनी सक्सेना यांचा समावेश होता.यावेळी त्यांच्यासमवेत कृषी व जलसंपदा सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, येवल्याचे प्रांताधिकारी भीमराज दराडे, चांदवडचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, बागलाणचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदिंसह तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे, इतर तालुक्याचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके व विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.समिती सदस्यांनी हरनूल येथील शेतकरी नामदेव त्र्यंबक रोैंदळ, हरसूल येथील महिला शेतकरी वैजंयती शिवाजी भोसले यांच्या शेतात जाऊन कांदा, टमाटे, चिक्कू या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.शेतकºयांच्या व्यथाया समितीसमोर परिसरातील शेतकºयांनी व्यथा मांडल्या. त्यात नाशिक जिल्हा बॅकेकडून पूर्वी कर्ज मिळत होते. ती बँक आता शेतकºयांना पुनर्गठन करुन कर्ज देत नसल्याच्या समस्यांही शेतकºयांनी मांडल्या. समितीने तालुक्यात सुमारे दीड तास पाहणी केली. नंतर अंधार झाल्याने दौºयातील काम संपवून ते नाशिककडे रवाना झाले.