नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दीपक महेंद्र अहिरे (रा़ संगमेश्वर, मालेगाव) याच्याविरुद्ध आडगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़ संशयित अहिरे याने विवाहाचे आमिष दाखवून जून २०१० पासून ते मे २०१५ पर्यंत या कालावधीत विविध ठिकाणी नेऊन या तरुणीवर अत्याचार केले़ तसेच विवाहाबाबत तरुणीने विचारणा केली असता तिला शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादित म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
तरुणीस विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार
By admin | Updated: February 4, 2016 23:36 IST