शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भक्ष्य ठेवले तीस फूट उंच साग वृक्षावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:36 IST

मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत.

नाशिक : मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. या भागातील पाळीव कुत्र्याची बिबट्याने पहाटेच्या सुमारास शिकार केली व त्यानंतर त्याला झाडावर ठेवल्याचे सोमवारी (दि.२५) दुपारी उघडकीस आले.गंगापूर-गोदावरी डावा तट कालवा महादेवपूरपासून पुढे वाहतो. जलालपूर, चांदशी, मखमलाबाद, मेरी-म्हसरूळ, पळसेपर्यंत या कालव्याच्या परिसरात बिबट्याचा संचार आढळतो. हा परिसर वन्यप्राण्यांचा नैसर्गिक कॉरिडोर असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. बिबट्या, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांसह रानमांजर, मोर यांचा या भागात अधिवास आढळतो.कुत्र्याची शिकार केल्यानंतर शेतातून फरफटत सुमारे तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर नेऊन दोन्ही फांद्यांच्या मध्ये कुत्र्याचा मृतदेह दडविला. हे झाड जंगली वेलींनी वेढलेले आहे, तरीही बिबट्याने झाडावर चढून आपले खाद्य ठेवून भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाडावरून उडी घेत नाल्यामधून गंधारवाडी सागजडी रोपवाटिकेच्या दिशेने धूम ठोकली. वैभव पिंगळे या तरुणालाही शेतालगत नाल्याच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिले. सायंकाळी वनरक्षक प्रकाश आहेर यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.मादीचे बछड्यांसह वास्तव्यडाव्या कालव्याच्या परिसरात नाल्यालगत मादी आपल्या पिलांसह दडून बसल्याची दाट शक्यता या भागातील शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. मादीने अनेकदा मखमलाबाद, गंधारवाडी या परिसरात वस्तीलगत दर्शन दिले आहे. या मादीची पिले आता सुमारे वर्षभराची झाली असून, बछडेदेखील मुक्त संचार करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.तरस, कोल्हे यांसारख्या वन्यप्राण्यांपासून भक्ष्य सुरक्षित ठेवण्यासाठी बिबटे झाडावर उंच ठिकाणी फांद्यांमध्ये दडवून ठेवतात. हे खाद्य खाण्यासाठी रात्री पुन्हा बिबटे सदर झाडावर चढतात. बिबट्याने जेव्हा कुत्र्याची शिकार केली असेल तेव्हा कदाचित तरसांनी तेथे आक्रमण केले असेल किंवा बिबट्याला तरसाचा धोका भक्ष्यासाठी जाणवला असावा म्हणून त्याने सागाच्या झाडाची निवड केली असावी.- मृणाल घोसाळकर, वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक