शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उद्या दुपारी दीड वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:31 IST

येत्या बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून बुधवारी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी त्यादिवशी ब्राह्यमुहूर्त म्हणजे पहाटे ५ वाजेपासून दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल,

नाशिक : येत्या बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून बुधवारी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी त्यादिवशी ब्राह्यमुहूर्त म्हणजे पहाटे ५ वाजेपासून दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येईल, असे सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट करतानाच मंगळवारी (दि.९) अमावास्या समाप्तीला घटस्थापना करू नये, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  येत्या बुधवारी (दि.१०) आश्विन शु.प्रतिपदा समाप्ती सकाळी ७.२६ वाजता आहे. सूर्याेदयानंतर एक मुहूर्तापेक्षा जास्ती (सुमारे ४५ मिनिटे) प्रतिपदा असते तेव्हा प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ करावे, असे वचन आहे. यावर्षी दिनांक १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना होत असून नवरात्रारंभ होत आहे. १० आॅक्टोबर रोजी सकाळी ७.२६ वाजता प्रतिपदा समाप्ती होत असली तरी १० आॅक्टोबर रोजी ब्राम्ह मुहूर्तापासून म्हणजे पहाटे ५ वाजल्यापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत घटस्थापना करता येते. सकाळी ७.२६ वाजेपूर्वी घटस्थापनेची घाई करण्याची आवश्यकता नाही. ९ आॅक्टोबर रोजी मात्र अमावास्या समाप्ती घटस्थापना करू नये, असेही दाते यांनी सांगितले. अशौचामुळे ज्यांना १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्तीनंतर (अशौच संपल्यावर) ११, १३, १६ आणि १७ आॅक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी व १८ आॅक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे.  महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी १६ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. दुर्गाष्टमी १७ आॅक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे १८ आॅक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त दुपारी २.२० ते ३.०७ या वाजेदरम्यान आहे.यंदा नवव्या दिवशी दसरादि. १८ आॅक्टोबर रोजी दसरा, नवरात्रोत्थापन (नवरात्र समाप्ती) व पारणा आहे. सर्वसाधारणपणे घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत ९ किंवा १० दिवसांचे अंतर असते. तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो. यावर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा कितव्याही दिवशी आला तरी शुभच असतो, असेही दाते यांनी सांगितले.

टॅग्स :Navratriनवरात्री