शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीत टमाटा लागवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:28 IST

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, करंजवण, म्हेळुस्के, परमोरी, अवनखेड, दहेगाव वागळूद आदी भागामध्ये टमाटा लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे मिळत नसल्याने शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे.

ठळक मुद्देहंगाम लांबला : नर्सरीमध्ये रोपे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर, करंजवण, म्हेळुस्के, परमोरी, अवनखेड, दहेगाव वागळूद आदी भागामध्ये टमाटा लागवड लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोपे मिळत नसल्याने शेतकरीवर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे.पावसाळा सुरू झाला की, या तालुक्यातील शेतकऱ्यांना नगदी पिकांची ओढ लागते. त्यासाठी भांडवल देणारे पीक म्हणून टमाट्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे जून, जुलै महिन्यात रोपे खरेदीसाठी मोठी लगबग सुरू झालेली असते. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या साथीमुळे नर्सरी व्यावसायिकांना मोठा फटका बसल्यामुळे नर्सरींमध्ये टमाट्याची रोपे उपलब्ध नसल्यामुळे दिंडोरी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी टमाट्याची रोपे उपलब्ध होत नसल्यामुळे घरीच गादी वाफ्याची नर्सरी करून रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यात वेळेचा अपव्यय होणार असल्याने हंगाम वाया जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील सुमारे तीनशे एकर क्षेत्र टमाटा लागवडीसाठी असते. परंतु यंदा रोपे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे हे क्षेत्र कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आम्ही दरवर्षी टमाटा पीक मोठ्या प्रमाणात घेत असतो. जून आणि जुलै महिन्यात जवळपास ५० ते ६० टक्के लागवड होत असते. परंतु यंदा कोरोनामुळे नर्सरीमध्ये रोपे उपलब्ध नसल्यामुळे टमाटा पीक आमच्या हातातून जाते की, काय याची भीती वाटते आहे.- हिरामण मोगल, टमाटा उत्पादक, लखमापूर

टमाटा पिकामुळे आम्हाला द्राक्षे पिके घेण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणात मिळविण्यासाठी मोठी मदत मिळत असते. परंतु यंदा कोरोनामुळे रोपे बुकिंग करूनसुद्धा मिळत नसल्यामुळे याचा परिणाम द्राक्षे हंगामावर होण्याची शक्यता वाटते आहे.- चिंधू पाटील, टमाटा उत्पादक, दहेगाव

यंदा कोरोनामुळे शेतकरीवर्गाला टमाटा रोपे उपलब्ध करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. परंतु शेतकºयांनी धीर न सोडता नियोजन करून आपल्या घरी गादी वाफ्याची नर्सरी करून टमाट्याची रोपे तयार करावीत. यंदाचा हंगाम थोडा लांबणीवर जाईल. पण रोपे घरच्या घरी तयार केली तर यांचा फायदा नक्कीच होईल.- अभिजित जमधडे, कृषी अधिकारी, दिंडोरी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी