पंचवटी : काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या टमाट्याचे पीक नासल्याने व त्यातच सध्या टमाटा मालाला मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आहेत. पंधरवड्यापासून टमाट्याचे दर टिकून असल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या लिलावात टमाट्याला प्रतिवीस किलो जाळीसाठी साडेसातशे रुपये असा बाजारभाव मिळाल्याचे बाजार समितीचे एम. पी. पाळदे यांनी सांगितले. फळभाज्यांमध्ये सध्या टमाटा मालाची आवक टिकून असून बाजारभावदेखील तेजीत असल्याने ग्राहकांना खिशाला झळ सहन करावी लागत आहे. दोन दिवसांपूर्वी टमाटा ४५ रुपये प्रति किलो दराने विक्री झाला होता. बाजार समितीत सध्या गिरणारे, दरी, मातोरी तसेच दिंडोरी या तालुक्यांतून टमाटा मालाची आवक होत आहे. आगामी कालावधीत टमाटा मालाचे उत्पन्न वाढल्यास दरात घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, टमाटा मालाला मागणी असल्याने व बाजारभाव टिकून असल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)
टमाटा तेजीतच; मागणी वाढली
By admin | Updated: November 19, 2015 22:47 IST