शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

पांढुर्ली उपबाजारात टोमॅटो लिलावास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 15:05 IST

सिन्नर: सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देपहिल्याच दिवशी सुमारे 4000 जाळ्यांची आवक

सिन्नर: सिन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली (सावतामाळीनगर) उपबाजार आवारात टोमॅटो खरेदी विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.पहिल्याच दिवशी सुमारे 4000 जाळ्यांची आवक झाली. टोमॅटो या शेतमालास कमाल रू.550/- तर सरासरी रू.350/- प्रती जाळी याप्रमाणे विक्रमी भाव मिळाला.यावेळी बाजार समितीचे संचालक संजय खैरनार, माजी उपसभापती उत्तम माळी (कानडे), विष्णुपंत ढोकणे, कारभारी हारक, निवृत्ती हारक, हिरामन मंडलीक, योगेश बोर्‍हाडे आदी उपस्थित होते.पहिल्या दिवशी परिसरातील विष्णुपंत हारक, भाऊसाहेब चव्हाणके, निवृत्ती हारक, आंबादास लहाणे, राजाराम हारक, ज्ञानेश्वर मंडलीक, नितीन भोर, युवराज भोर, कैलास वाजे, संतु पवार, सिताराम शेळके, रतन लहाणे, बाळु दळवी, नवनाथ पाडेकर, राजु परदेशी, संपत भांगरे, विलास वाजे, प्रल्हाद हगवणे, कैलास दळवी, बाळासाहेब पवार आदी शेतकर्‍यांनी टोमॅटो शेतमाल विक्रीसाठी आणला. टोमॅटो खरेदीसाठी आर. के. बागवान, लक्ष्मी ट्रेडींग कपनी, प्रभाकर हारक, निवृत्ती चव्हाणके, बाळासाहेब दळवी, रईस पटेल, एफ. एम. ट्रेडर्स, शालीमार ट्रेडर्स, एस. एस. बागवान, श्री गणेश ट्रेडींग कंपनी, जोशी ट्रेडर्स, के. एस. बी. कंपनी, नाना खरात, फिरोज शेख, मे. एन. जी. एस. कंपनी, जब्बारभाई शेख, बापुशेठ डांगे, आल्मभाई शेख दिल्ली एक्सपोर्ट, शाकीर युसुब शेख,अन्सारभाई शेख, मे.एन.बी.एस.कंपनी, आतीफभाई शेख, मे. बी. आर. टी. कंपनी, प्रमोदशेठ यादव, अनिलशेठ हारक, साईबाबा व्हीजीटेबल कं. हरीयाणा, न्यु मिलन व्हीजीटेबल कंपनी येवलावाले आदींनी लिलावात सहभागी होवून टोमॅटो शेतमाल खरेदी केला.बाजार समितीच्या वतीने आलेल्या प्रत्येक व्यक्तीस सॅनीटायझरचा वापर करण्यात येत होता. तसेच कोविड-19 या रोगाचा प्रतिबंध करणेसाठी उपाययोजना म्हणुन नाका तोंडाला मास्क लावणे, सोशलडिस्टंसींग ठेवणे, बाजार आवारात विनाकारण गर्दी टाळणे इत्यादी सुचना लाऊडस्पिकर वरुन वारंवार करण्यात आल्या. पांढुर्ली परिसरातील टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी आपला टोमॅटो शेतमाल पांढुर्ली उपबाजार येथे दररोज दुपारी दोन वाजता विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले. टोमॅटो खरेदी-विक्रीचे कामकाज सुयोग्य पध्दतीने होण्यासाठी बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव राजेंद्र जाधव, इन्चार्ज रंगनाथ डगळे, निरीक्षक सोमनाथ चव्हाणके, रोहित उगले, अर्जुन भांगरे, एस.के.पवार आदींसह बाजार समितीच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरMarket Yardमार्केट यार्ड