नाशिक : शेतकरी संपाची दिशा ठरविण्यासाठी उद्या, गुरुवारी (दि. ८) नाशिक येथे राज्य परिषद घेण्यात येणार आहे. यात खासदार राजू शेट्टींसह विविध शेतकरी नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांची या परिषदेच्या निमित्ताने एकजूट होणार आहे. या परिषदेच्या बैठकीची जोरदार तयारी बुधवारी (दि. ७) नाशिकमध्ये सुरू होती. आंदोलनाचे नेतृत्व करण्याची संधी या परिषदेच्या निमित्ताने नाशिकला मिळाल्याने या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्याचे बुधवारी आयोजित बैठकीत ठरविण्यात आले. सुकाणू समिती सदस्य राजू देसले, हंसराज वडघुले, चंद्रकांत बनकर यांच्या उपस्थितीत नियोजनसाठी बैठक झाली. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आगामी आंदोलनाची दिशी ठरविण्यासाठी गुरुवारी (दि. ८) दुपारी १ वाजता तुपसाखरे लॉन्स येथे राज्य परिषद होत आहे. या परिषदेला खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, बाबा आढाव, रघुनाथदादा पाटील, कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक मार्गदर्शन करणार आहेत.
नाशकात आज राज्यस्तरीय परिषद
By admin | Updated: June 8, 2017 00:29 IST