शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या आजच्या भूमिकेने समीकरणे ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:06 IST

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानासाठी २४ तासांचा कालावधी शिल्लक असतानाही भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत या निवडणुकीची उत्सुकता वाढविली असली तरी भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने या निवडणुकीत उमेदवारी करणारे जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी समर्थक भाजपाच्या या भूमिकेने नाराज झाले आहेत.

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या मतदानासाठी २४ तासांचा कालावधी शिल्लक असतानाही भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवत या निवडणुकीची उत्सुकता वाढविली असली तरी भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने या निवडणुकीत उमेदवारी करणारे जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी समर्थक भाजपाच्या या भूमिकेने नाराज झाले आहेत. खुद्द भाजपाच्या मतदारांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पक्ष  नेतृत्वावर येत असलेल्या दबावापोटी आता रविवारी सायंकाळी सहा वाजता पक्षाकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासकीय पातळीवर एकीकडे तयारी करीत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवर हालचालीही गतिमान झाल्या असून, शनिवारी दुपारी कॉँग्रेस आघाडीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले आहेत तर शिवसेनेचे सदस्य अजूनही सहलीसाठी बाहेरगावीच आहेत. मात्र भाजपाने अद्यापही या निवडणुकीत कोणतीच भूमिका न घेतल्याने मित्रपक्ष शिवसेना अडचणीत सापडली आहे. अखेरच्या क्षणी भाजपा आपल्याला पाठिंबा देईल, अशी आशा शिवसेना बाळगून असताना दुसरीकडे भाजपाच्या छुप्या पाठिंब्यावर उमेदवारी करणारे जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांनादेखील भाजपाने अखेरच्या क्षणापर्यंत प्रतीक्षेत ठेवले आहे. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्व भाजप मतदारांना मुंबईत बोलावून निर्णय जाहीर करण्यासारखे वातावरण निर्माण केले, परंतु त्या बैठकीतही कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे मतदानाला २४ तास शिल्लक असताना भाजप काय भूमिका घेते याकडे शिवसेनेसह राष्टÑवादी व जिल्हा विकास आघाडीचे लक्ष लागले आहे. भाजपाच्या नगरसेवकांमध्येदेखील याबाबत संभ्रम निर्माण झालेला असून, नेमके मतदान कोणाला करावे, असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री गिरीश महाजन व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या उपस्थितीत भाजपाच्या मतदारांची बैठक होणार असून, या बैठकीत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. भाजपाने अद्यापही कोणाला पाठिंबा दिलेला नाही, हे स्पष्ट करताना भाजपाच्या नावे अनेक अफवा उठविण्यात आल्या असून, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये हे सांगण्यासही सानप विसरले नाही. त्यामुळे रविवारी भाजप काय भूमिका जाहीर करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक