शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आजपासून साहित्यिक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:12 IST

१७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

नाशिक : १७७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे शनिवार (दि. २३)पासून आयोजन करण्यात आले असून, ग्रंथदिंडीने या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ९ वाजता टिळकवाडी येथील कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीने या सोहळ्यास सुरुवात होणार असून, या ग्रंथदिंडीत शहरातील १३ शाळेतील हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसह चित्ररथ, ढोलपथक, लेजीम पथक, ध्वज पथक आदींचा समावेश असणार आहे. परशुराम साईखेडकर येथे ग्रंथदिंडीचा समारोप झाल्यानंतर सकाळी ११ वाजता साहित्यिक मेळाव्याचे सिनेअभिनेते तथा नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्घाटनाप्रसंगी जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या माजी अध्यक्षांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात २ वाजता ‘नाटक : काल आज आणि उद्या’, तर तीन वाजता ‘कवितेचे अंतरंग’ या विषयावरील परिसंवाद रंगणार आहे. साहित्य मेळाव्याचे अध्यक्ष नाट्य लेखक दत्ता पाटील यांचा आतापर्यंतचा जीवनपट उलगडून सांगणाºया ध्वनी चित्रफितीचे संध्याकाळी साडेचार वाजता सादरीकरण करण्यात येणार असून, खुल्या साहित्य संमेलनाने साहित्य मेळाव्याच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांचा समारोप होणार आहे. रविवारी (दि. २४) साहित्यिक मेळाव्याच्या दुसºया दिवशी सकाळी १० वाजता मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील यांचे बीजभाषण होणार असून, सकाळी ११ वाजता ‘समाज माध्यमांचे साहित्यावर होणारे परिणाम’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे.मेळाव्याच्या दुसºया दिवशी सावानातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच रविवारी संध्याकाळी ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने यांना ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते सन्मानित करून सुवर्ण महोत्सवी साहित्यिक मेळाव्याचा समारोप होणार आहे. सावानाच्या सुवर्ण महोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यास उपस्थित राहणाºया श्रोत्यांना सावानातर्फे विशेष सन्मानचिन्ह देण्यात येणार असल्याची माहिती सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली. दोन दिवस चालणाºया या साहित्यिक मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.