शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजची महासभा रद्द; स्थायीचा मात्र अखेरचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:26 IST

शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडांच्या भूसंपादनावरून सुरू असलेल्या वादात शासनाने अंतरिम स्थगिती दिल्याने शनिवारी (दि.२९) महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीने मात्र आठ सदस्यांच्या मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशीही सकाळी ८ वाजता बैठक बोलवली आहे. त्यात अनेक विषय मंजूर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे भूसंपादन प्रकरणांबाबतदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिक : शहर विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडांच्या भूसंपादनावरून सुरू असलेल्या वादात शासनाने अंतरिम स्थगिती दिल्याने शनिवारी (दि.२९) महापौर सतीश कुलकर्णी यांनी बोलविलेली महासभा रद्द करण्यात आली आहे. स्थायी समितीने मात्र आठ सदस्यांच्या मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशीही सकाळी ८ वाजता बैठक बोलवली आहे. त्यात अनेक विषय मंजूर होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे भूसंपादन प्रकरणांबाबतदेखील निर्णय होण्याची शक्यता आहे.शहरातील आरक्षित भूखंडांचे भूसंपादन करण्यासाठी प्रशासनाने समिती गठित केली होती. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून, २८ प्रकरणात १५७ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. धोरण ठरविण्याचा अधिकार महासभेचा असल्याने यापुढे भूसंपादनाचे प्रस्ताव महासभेतच मांडावे, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनातील अधिकारी स्थायीवर प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असल्याने शनिवारी तातडीची महासभा बोलविण्यात आली होती. मात्र, राज्य शासनाने निर्णय घेण्यास स्थगिती दिल्याने महापौरांनी महासभा रद्द केली आहे.आज निरोपाची सभास्थायी समिती मात्र अजूनही प्रशासन प्रस्ताव सादर करेल या प्रतीक्षेत आहे. समितीची अखेरची सभा शनिवारी (दि.२९) सकाळी ९ वाजताच होणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेला सुटी असतानाही ही सभा होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण