नाशिक : ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवर अढळस्थानी विराजमान झाले असून, या नाटकाने गतवर्षी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत़ अल्पावधीतच आता हे नाटक अडीचशे प्रयोगांचा टप्पा गाठत आहे़ महाराष्ट्रदिनी म्हणजेच १ मे रोजी कालिदास कलामंदिरात संगीत देवबाभळीचा प्रयोग होणार आहे़नाशिकच्या मातीतून निघालेले अस्सल सोने म्हणजे संगीत देवबाभळी हे नाटक आहे़ इ़स़ २०१८ वर्षातील नाट्यसृष्टीतील सर्वाधिक म्हणजे ३९ पुरस्कार या नाटकाने पटकाविले असून, या शतकातील सर्वोत्कृष्ट नाटक आहे, असा गौरव बोरीवली (मुंबई) येथील कलारजनी सोहळ्यात करण्यात आला़त्याचप्रमाणे चित्रपट, नाटक व संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंतांनी तसेच साहित्यिकांनी या नाटकातील कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे़ नाशिक शहरात या नाटकाचा महाराष्ट्रदिनी प्रयोग होत असल्याने त्याचे स्वागत करण्यात येत आहे़
‘संगीत देवबाभळी’ नाटकाचा आज प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:15 AM