शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच नगराध्यक्षांची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 01:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (दि. ३०) रोजी निवडणूक होत आहे. निफाड येथील भाजपा उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राविषयी शिवसेना नगरसेवकांनी महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केल्याने या अपिलाच्या निकालाकडे संपूर्ण निफाडकरांचे लक्ष लागले आहे.  कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष-पदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अ‍ॅड. काशीनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून ...

नाशिक : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष निवडीसाठी बुधवारी (दि. ३०) रोजी निवडणूक होत आहे. निफाड येथील भाजपा उमेदवाराच्या नामनिर्देशन पत्राविषयी शिवसेना नगरसेवकांनी महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केल्याने या अपिलाच्या निकालाकडे संपूर्ण निफाडकरांचे लक्ष लागले आहे.  कळवण नगरपंचायतच्या नगराध्यक्ष-पदासाठी काँग्रेसकडून माजी आमदार अ‍ॅड. काशीनाथ बहीरम यांचे सुपूत्र मयुर बहीरम व भाजपकडून नगरसेविका सौ सुरेखा जगताप या दोघांमध्ये लढत होत असून काँग्रेसच्या सौ रोहीणी महाले यांनी मंगळवारी नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस व भाजप यांच्यात आमने सामने दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने काँग्रेसच्या मयुर बहीरम यांच्या नावाला हिरवा कंदील दिला असून भाजपकडे बहुमत नसतांनौ सुरेखा जगताप या नगराध्यक्ष निवडणुकीला सामोरे जात असल्याने चमत्कार होतो की काय याकडे कळवणकरांचे लक्ष लागले आहे.  निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाचे एकनाथ तळवाडे यांनी दाखल केलेले नामनिर्देशपत्र रद्द करावे यासाठी शिवसेना नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयात अपील दाखल केल्याने या निवडणुकीकडे निफाडकरांचे लक्ष लागले आहे. या अपीलावर बुधवारी सकाळी ११.३० वा आयुक्तालय कार्यालयात सुनावणी होत असून या निकालावर नगराध्यक्षपद निवडीचे भवितव्य अवलंबून आहे .दरम्यान या निवडणुकीत भाजप व आघाडीकडे १० नगरसेवक आहेत, तर सेनेकडे ६ नगरसेवक आहेत. त्यामुळे या पदावर भाजपचे एकनाथ तळवाडे यांची निवड निश्चित मानली जात आहे .  देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विद्यमान नगराध्यक्षा जोत्स्ना संजय अहेर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची पुढील कालावधीसाठी नगराध्यक्षा म्हणून निवड निश्चित झाली आहे. पेठच्या नगराध्यपदाच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी गटासह विरोधी गटातील उमेदवारांनी माघार घेतल्याने विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज घोंगे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक रेखा गवळी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे विद्यमान नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने अनुसूचित जमाती महिला राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर झाला मालेगावच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रि या राबविण्यात येणार आहे.पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आज संपणारकळवण, निफाड, देवळा, चांदवड आणि पेठ या पाच नगर पंचायतींच्या नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ बुधवारी (दि. ३० ) रोजी संपत असल्याने नूतन नगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकाºयांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचीही आज निवड करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदासाठी २५ मे रोजी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक