शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक अध्यक्षांची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:49 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन भरण्यापूर्वी नाव निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष-पदासाठी शनिवारी निवडणूक होत असून, या पदासाठी इच्छुक असलेल्यांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांकडून कोणताही ‘निरोप’ न आल्याने त्यांची घालमेल कायम आहे. शनिवारी अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी नामांकन भरण्यापूर्वी नाव निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  जिल्हा उपनिबंधक नीळकंठ कºहे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी ११ ते साडेअकरापर्यंत उमेदवारांना नामांकन भरण्याची वेळ देण्यात आली असून, त्यानंतर छाननी व माघारीनंतर थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे असावे यासाठी पार्टीच्या इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. गेली अडीच वर्षे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद शिवसेनेकडे असल्यामुळे येणाºया कालावधीत भाजपाकडे हे पद असावे असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरण्यात आल्यामुळे भाजपात इच्छुकांची संख्या अधिक आहे. खुद्द खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे यांच्यासह माणिकराव कोकाटे, केदा अहेर, परवेज कोकणी यांची नावे अधिक चर्चेत असली तरी, त्यातही कोकाटे, अहेर, कोकणी यांच्यातच खरी चुरस निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी उमेदवार ठरविण्याचे अधिकार पालकमंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आल्यामुळे आता त्यांच्यावरच सारी मदार आहे. शनिवारी सकाळी पालकमंत्र्यांकडून उमेदवाराचे नाव जाहीर होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेने जिल्हा बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा बॅँकेची निवडणूक बिनविरोध पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्याची बॅँकेची अवस्था पाहता, शेतकरी हितासाठी बॅँक वाचावी ही शिवसेनेची भूमिका असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सेना इच्छुक नसल्याचे माजी उपाध्यक्ष सुहास कांदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या संचालकांची रात्री उशिरा अज्ञातस्थळी बैठक होऊन त्यात शनिवारची व्यूहरचना आखण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक