शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

‘आयमा’च्या अध्यक्षपदाचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:52 IST

आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आयमाच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी अध्यक्षपदाच्या एका पदासाठी झालेल्या मतदानात १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी शेवटच्या वेळेपर्यंत शांततेत पार पडलेल्या मतदानात एकूण ६८ टक्के मतदान झाले. उद्या (दि. ३०) सकाळी मतमोजणी होणार आहे.

सिडको : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या आयमाच्या चुरशीच्या निवडणुकीत मंगळवारी अध्यक्षपदाच्या एका पदासाठी झालेल्या मतदानात १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी शेवटच्या वेळेपर्यंत शांततेत पार पडलेल्या मतदानात एकूण ६८ टक्के मतदान झाले. उद्या (दि. ३०) सकाळी मतमोजणी होणार आहे.  उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत विरोधी एकता गटाने केवळ अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढविल्याने २६ पैकी २५ जागा या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी (दि.२९) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत अबंड येथील आयमा रिक्रियेशन सेंटर येथे मतदान शांततेत पार पडले. सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून वरुण तलवार, तर विरोधी एकता पॅनलकडून अध्यक्षपदासाठी तुषार चव्हाण या दोघांमध्ये सरळ लढत असल्याने या निवडणुकीकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे. आयमा या संस्थेच्या माजी अध्यक्षांनी मागील निवडणुकीप्रमाणे यंदाची निवडणूकदेखील बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही पॅनलच्या गटांची बैठक घेत समझोता करण्याचा प्रयत्न केला, परंतु यास यश न आल्याने अखेरीस निवडणूक घेण्यात आली. सकाळपासून मतदारांचा उत्साह  दिसून येत होता. १० वाजेपर्यंत ८० मतदारंनी मतदानाचा हक्क बजावला होता.यानंतर सकाळी ११ वाजेपर्र्यंत मतदानाचा आकडा हा २०९ इतका झाला होता. यानंतर मतदानासाठी गर्दी होत गेल्याने १२ वाजेपर्यंत ४२९ इतके मतदान झाले होते. दुपारी दोन ते चार दरम्यान उन्हामुळे मतदारांचा ओघ कमी झाला असला तरी तीन वाजेपर्यंत ७८८ इतके मतदान झाले. यानंतर शेवटच्या दोन तासांत मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. चार वाजेपर्यत ९५० इतके मतदान झाले, तर मतदानाच्या शेवटच्या तासात ९० मतदारांनी आपला मतदानचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत १५३१ मतदारांंपैकी १०४० मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. जी. जोशी, सी. डी. कुलकर्णी, मधुकर ब्राह्मणकर यांनी काम पाहिले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Electionनिवडणूक