शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा, नामपूर बाजार समितीची आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:20 IST

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सटाणा, नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही बाजार समितीच्या ७४ उमेदवारांचे नशीब मंगळवारी मतपेटीत बंद झाले असून, आजच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सटाणा : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या सटाणा, नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (दि. ३१) मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दोन्ही बाजार समितीच्या ७४ उमेदवारांचे नशीब मंगळवारी मतपेटीत बंद झाले असून, आजच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.बागलाण तालुक्यातील सटाणा बाजार समितीच्या १४ तर नामपूर बाजार समितीच्या १३ जागांसाठी गेल्या मंगळवारी मतदान झाले. सभापतिपदावर डोळा ठेवून या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी उडी घेतल्यामुळे अखेरच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली होती. यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागून आहे. या निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, माजी आमदार दिलीप बोरसे, उमाजी बोरसे यांच्या समर्थकांनी आमनेसामने दंड थोपटल्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. या निवडणुकीच्या निकालाचे परिणाम आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत. त्यामुळे आजीमाजी आमदारांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.  सटाणा बाजार समितीची मतमोजणी सकाळी १० वाजेपासून येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तर नामपूरची मतमोजणी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या आवारातील ईशान्य बाजूकडील दुसऱ्या क्र मांकाच्या गुदामात करण्यात येणार आहे. सटाणा बाजार समितीच्या आडते, हमाल मतदारसंघ व हमाल, मापारी मतदारसंघासाठी एक टेबल व शेतकरी मतदारसंघातील १० गणांसाठी १० टेबल अशा ११ टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होईल.  नामपूरच्या हमाल, मापारी मतदारसंघ व शेतकरी मतदारसंघातील १२ गणांच्या मतमोजणीसाठी एकूण १३ टेबल ठेवण्यात आले असून, एकाच वेळी मतमोजणी करण्यात येणार आहे. या मतमोजणीस उमेदवार व उमेदवाराने रीतसर नेमलेला एक प्रतिनिधी कक्षात उपस्थित राहू शकतो. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिलेले ओळखपत्र मतमोजणीसाठी आणणे बंधनकारक राहणार आहे. सर्व निकाल दुपारी साडेतीन वाजेपर्यंत लागणे अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूक