नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील सुपरक्रॉस लीगची पहिली फेरी शनिवारपासून (दि़ ८) शहरात रंगणार असल्याची माहिती सुपर क्रॉस लीगचे ईशान लोखंडे व शिवम दवे यांनी दिली़ पाथर्डीगाव रोडवरील कुटे सुपरक्रॉस ट्रॅक येथे सुपरक्रॉस लीगच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होणार आहे़ दोन दिवस या स्पर्धा शहरात रंगणार असून, दुसरी फेरी कोल्हापूर येथील मोहितेस रेसिंग अकॅडमी येथे होणार आहे, तर अंतिम फेरी १२ डिसेंबरला पुणे येथे होणार आहे़ यामध्ये अरान्हा रेसिंग टीम, सॅन रेसिंग, एसकेपी हायरोलर्स रेसिंग, पाषाणकर रेसिंग, सॅन रेसिंग, पी़ बी़ रेसिंग, डीएसके रसिंग असे आठ संघ विजेतेपदासाठी लढत देणार आहेत़ या लीगमध्ये खेळाडूंचे लिलाव झाले असून, ३५ राष्ट्रीय व सात आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धक या लीगमध्ये उतरले आहेत़
आजपासून शहरात सुपर क्रॉसचा थरार
By admin | Updated: November 8, 2014 00:29 IST