शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून राज्य नाट्य स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:14 IST

नाशिक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेला आज (दि. ६) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरुवात होणार आहे. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता या नाट्ययज्ञाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

नाशिक : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धेला आज (दि. ६) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरुवात होणार आहे. नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता या नाट्ययज्ञाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.नाशिक विभागातून या स्पर्धेसाठी २१ नाट्यप्रयोग सादर होणार असून, सगळ्यांच नाट्यकर्मींसाठी पर्वणी असलेल्या या स्पर्धेतून अनेक चुरशीचे प्रयोग बघायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी विजय नाट्य मंडळाच्या ‘हे रंग जीवनाचे’ या लेखक दिग्दर्शक नेताजी भोईर यांच्या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. या स्पर्धेअंतर्गत मंगळवारी (दि. ७) विच्छा माझी पुरी करा, बुधवारी (दि. ८) रक्तबीज, गुरुवारी (दि. ९) ‘सतम तारा’, शुक्रवारी (दि. १०) श्यामची आई, शनिवारी (दि. ११) आणि धम्म..., रविवारी (दि. १२) सती न गेलेली महासती, सोमवारी (दि. १३) पोशा, मंगळवारी (दि. १४) प्रयास, बुधवारी (दि. १५) एडिपस रेक्स, गुरुवारी (दि. १६) वंशभेद, शुक्रवारी (दि. १७) तितिक्षा, शनिवारी (दि. १८) ये मामला गडबड हंै, सोमवारी (दि. २०) ती रात्र, मंगळवारी (दि. २१) अ‍ॅनिमल प्लानेट, बुधवारी (दि. २२) नाव झालं पाहिजे, गुरुवारी (दि. २३) छक्के पंजे, शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सत्रात एक्झिट, तर संध्याकाळच्या सत्रात मून विदाउट स्काय, शनिवारी (दि. २५) सकाळच्या सत्रात उत्तरदायित्व आणि संध्याकाळच्या सत्रात चाहूल हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.सकाळच्या सत्रातील नाट्यप्रयोग सकाळी ११.३० वाजता तर संध्याकाळच्या सत्रातील नाट्यप्रयोग संध्याकाळी सात वाजता सादर होणार असून, या स्पर्धेसाठी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.