शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

२७८ केंद्रांवर आज शिष्यवृत्ती परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:01 IST

महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत.

नाशिक : महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दि. २४ रोजी घेतली जाणार आहे. शहर आणि जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी एकूण ४५ हजार ३२७ विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षेचे संपूर्ण नियोजन पूर्ण करण्यात आले असून, विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे आसन क्रमांक पोहचविण्यात आले आहेत. पुणे येथील परीक्षा परिषदेच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदर परीक्षा घेतली जाणार आहे. नाशिक जिल्ह्णातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी)च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्णातील २७८ केंद्रांवर होणार असून, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२२ केंद्रांवर १९,२३८ विद्यार्थी देणार आहेत. त्यासाठी ९५४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (पाचवी) साठी २६ हजार ८९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, १५६ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे.पहिला पेपर हा दुपारी १ ते २.३०, पेपर क्रमांक २ हा दुपारी ३.३० ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात प्रथम भाषा आणि गणिताची परीक्षा होणार आहे. दुपारच्या सत्रात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा होणार आहे. ३०० गुणांची ही परीक्षा असून ७५-७५ गुणांचे दोन पेपर्स असे परीक्षेचे स्वरूप आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे २७८ केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आब्जेक्टीव टाईप ही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची कार्बनप्रिंट मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेप्रमाणेच विद्यार्थ्याला यामुळे आपल्या गुणांची पडताळणी करणे सोपे होणार आहे. यातून या परीक्षेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.सदर शिष्यवृत्ती परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू आणि गुजराथी या चार भाषांमध्ये होणार आहे. जिल्ह्णात जिल्हाधिकारी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके परीक्षेवर नजर ठेवून असणार आहेत.विशेष म्हणजे यंदा विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवर हाताने आसन क्रमांक लिहावा लागणार नाही, तर तो उत्तरपत्रिकेवर प्रिंटेड असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचा उत्तरपत्रिका भरण्यासाठी लागणारा वेळदेखील वाचणार आहे. स्वाक्षरी पटदेखील छापील असल्यामुळे यावर विद्यार्थ्यांना केवळ सही करावी लागणार आहे.सैनिकी परीक्षेला ७२ विद्यार्थीशिष्यवृत्ती परीक्षेच्या काळातच अखिल भारतीय सैनिकी परीक्षादेखील आहे. शिष्यवृत्तीला बसलेले ७२ विद्यार्थी सैनिकी परीक्षेला पात्र ठरल्याने त्यांचीही परीक्षा रविवार, २३ रोजीच होणार आहे. विद्यार्थ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ही सकाळी १० ते १२ या वेळेत शासकीय कन्या शाळा या ठिकाणी होणार आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदScholarshipशिष्यवृत्ती